Naresh Mhaske News: ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात गुप्ता बंधूंची भेट का घेतली?

Naresh Mhaske on Uddhav Thackeray: दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंची भेट घडवून देण्यासाठीच ठाकरेंचा दिल्ली दौरा असावा, अशा शब्दात म्हस्केंनी टीका केली.

Naresh Mhaske on Uddhav Thackeray Delhi Daura News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकताच तीनदिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी गुप्ता बंधूंना भेटले. तरी, दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंची भेट घडवून देण्यासाठीच ठाकरेंचा दिल्ली दौरा असावा. अशा शब्दात म्हस्केंनी टीका केली. नरेश म्हस्के हे शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार आहेत. ७ ऑगस्टला संजय राऊत यांनी दुपारी ठाकरे अन् गुप्ता बंधूंची भेट घडवून आणल्याचं दिसत आहे. ही भेट कशासाठी झाली? याची सखोल चौकशी होणे गरजेचं असल्याचं म्हस्केंनी म्हटलंय. ज्या माणसाने एका देशाला फसवलं, त्याची भेट का घेतली? त्यांच्या घरातील CCTV बंद केले असतील तर रस्त्यावरचे सीसीटीव्ही किंवा त्यांचे फोन तपासा, अशी मागणीही म्हस्केंनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.