Created By: PTI Fact Check
Translated By: Sakal Digital Team
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि इंडिया टीव्हीचे न्यूज अँकर रजत शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एका नव्या दाव्याद्वारे मधुमेह कायमचा नष्ट करण्याचा कथित दावा करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये अमिताभ यांनी स्वत: दोन आठवड्यात डायबिटीसपासून कायमची सुटका करून घेतली असून ते देशातील औषध कंपन्यांवर हल्लाबोल करत असल्याचे ऐकू येत आहे.