Fact Check : रणवीर सिंगने पंतप्रधान मोदींवर टीका केली नाही! व्हायरल होत असलेला व्हिडिओ 'डीपफेक'

Ranveer Singh : याच आठवड्यामध्ये अभिनेता आमिर खानचा एक डीपफेक व्हिडिओ देखील व्हायरल होत होता. आता रणवीरचा व्हिडिओही असाच शेअर केला जात आहे.
Ranveer Singh, Deepfake, Fact Check, Sakal
Ranveer SinghSocial Media
Updated on

Created By : बूम

Translated By : सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये रणवीर पंतप्रधान मोदींवर टीका करताना दिसत आहे. वाढती बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यावरुन तो टीका करत आहे. मात्र हा व्हिडिओ खोटा असून, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व्हॉईस क्लोन आणि डीपफेकच्या मदतीने तयार करण्यात आलेला आहे.

बूम या वेबसाईटने या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर या व्हिडिओमध्ये सिंथेटिक व्हॉईस क्लोनिंगचा वापर केल्याचं स्पष्ट झालं. हा व्हिडिओ रणवीरने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचा आहे. या मुलाखतीमध्ये खरंतर रणवीर पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या 42 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये असं ऐकू येतंय, की "मोदींचा हाच उद्देश्य आहे. आपलं दुःखी आयुष्य, आपली भीती, आपली बेरोजगारी आणि महागाई या गोष्टींची ते मजा घेत आहेत. आपला भारत देश आता वेगाने अन्यायाच्या काळात जात आहे. त्यामुळे आपण विकास आणि न्यायाची मागणी थांबवायला नको. म्हणूनच आपण विचार करून मतदान करणं गरजेचं आहे." या व्हिडिओमध्ये पुढे रणवीर लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन देखील करत आहे.

याच आठवड्यामध्ये अभिनेता आमिर खानचा एक डीपफेक व्हिडिओ देखील व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये आमिर खान मोदींवर टीका करत होता. कित्येक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता.

आता रणवीरचा व्हिडिओही असाच शेअर केला जात आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुजाता पॉल यांनी आपल्या व्हेरिफाईड एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. "व्होट फॉर न्याय, व्होट फॉर काँग्रेस" असं कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिलंय. ही पोस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा, आणि याचं अर्काईव्ह व्हर्जन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Screengrab of Sujata Paul's X Post
Screengrab of Sujata Paul's X PosteSakal

फॅक्ट चेक :

बूमने Itisaar या डीपफेक डिटेक्शन टूलच्या मदतीने या व्हिडिओची तपासणी केली. आयआयटी जोधपूरने हे टूल तयार केलं आहे. रणवीरच्या व्हिडिओमध्ये व्हॉईस क्लोनिंगचा वापर केल्याची माहिती या टूलने दिली.

या व्हिडिओमधील व्हॉईस आणि रणवीरचे ओठ हे सिंक होत नाहीयेत. तसंच, व्हॉईस ओव्हरमध्ये अनियमितता दिसून येत आहे.

Ranveer Singh, Deepfake, Fact Check, Sakal
Fact Check: लोकसभा निवडणुकीत अभिनेता आमिर खान काँग्रेसचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ खोटा

यासोबतच बूमच्या फॅक्ट चेकिंग टीमने Contrails AI कंपनीच्या तज्ज्ञांशी देखील संपर्क साधला. त्यांच्या डिटेक्शन टूलच्या मदतीने या व्हिडिओची तपासणी करण्यात आली. या चाचणीमध्ये दिसून आलं, की हा व्हिडिओ पूर्णपणे खरा असला, तरी त्यातील ऑडिओ नक्कीच खोटा आहे.

Audiospoof Test Result
Audiospoof Test ResulteSakal

बूमला हा ओरिजिनल व्हिडिओही सापडला. एएनआयच्या अधिकृत एक्स हँडलवरुन 14 एप्रिल 2024 रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये रणवीरचा आवाज अगदी नॉर्मल असल्याचं दिसत आहे. या पोस्टचं अर्काईव्ह व्हर्जन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ओरिजिनल व्हिडिओ पाहिल्यानंतर बूमच्या टीमला हे लक्षात आलं, की त्या मुलाखतीतील 1:18 मिनिट ते 1:54 मिनिट एवढा भाग काढून तो एडिट करण्यात आला आहे. ओरिजिनल व्हिडिओमध्ये रणवीर सिंग त्याचा काशीमधील अनुभव सांगत आहे. तसंच भारताचा समृद्ध इतिहास, वारसा आणि संस्कृती साजरी करण्याचं मोदीजींचं व्हिजन कसं चांगलं आहे याबाबत रणवीर बोलत आहे.

निष्कर्ष :

पंतप्रधान मोदींवर टीका करत असलेला रणवीर सिंगचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, बूमच्या फॅक्ट चेक तपासणीत हा व्हिडिओ खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. रणवीरचा व्हिडिओ खऱा असला, तरी त्यामधील ऑडिओ हा एआयच्या मदतीने एडिट केलेला आहे. रणवीर पंतप्रधानांवर टीका करत असल्याचा ऑडिओ टाकून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.