Created By: Aaj Tak Fact Check
Translated By: Sakal Digital Team
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात प्रचंड गर्दी दिसत आहे. या व्हिडिओ बाबत दावा केला जात आहे की, धुळे जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसच्या उमेदवाराला शून्य मते मिळाल्याने समर्थकांनी गोंधळ घातला. दाव्यानुसार, अवधान नावाच्या या गावातील बहुतांश लोक काँग्रेस समर्थक असून, काँग्रेसचे उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना एकही मत मिळाले नसल्याचे निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप करत त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर जोरदार निदर्शने केली. व्हिडिओमध्ये अनेक लोक एकत्र येऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत.