देशात सध्या 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुका सात टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (26 एप्रिल) सुरुवात झाली आहे.
दरम्यान महाराष्ट्रातही सर्वच पक्ष प्रचाराची राळ उठवत आहेत. अशात महाराष्ट्रातील हाय प्रोफाईल लढत मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघातून दोन माजी शिवसैनिक वेगवेगळ्या पक्षातून आमने सामने आहेत.
दरम्यान विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) तर माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांतून निवडणूक लढवत आहे.
या सर्व घडामोडीत आंबेगावातील बडे प्रस्थ समजले जाणारे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते यांनी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना पाठिंबा दिल्याचा दावा करणारा एक फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने दावा केला आहे की, आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रावादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते देवदत्त निकम यांनी राष्ट्रावादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनां पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना मोठा धक्का बसला आहे.
या एक्स युजरने आपल्या 18 एप्रिल 2024 रोजी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, "अमोल कोल्हे यांना आंबेगावमधून मोठा धक्का. देवदत्त निकम, शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्यासोबत."
'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.
दावा करणाऱ्या पोस्टमध्ये वापरलेल्या फोटोचे रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची 19 एप्रिल 2024 रोजीची एक्स पोस्ट सापडली. ज्यामध्ये हा फोटा एका विवाह समारंभातील असल्याचे स्पष्ट झाले.
आढळराव पाटील यांनी यासोबत केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "डोंगरगण टाकळेहाजी येथे, जीवनमित्र मेडिकल अध्यक्ष डॉ. हिरामण गबाजी चोरे व डोंगरगण ग्रामपंचायत सदस्य मोहनभाऊ चोरे यांनी आयोजित केलेल्या जय हनुमान सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त भेट दिली. नवं आयुष्य सुरु करणाऱ्या सहा नवविवाहित जोडप्यांना पुढील वैवाहिक आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या."
यावरुन हे निष्पन्न होते की, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते देवदत्त निकम एका विवाह सोहळ्यासाठी व्यासपीठावर एकत्र आले होते.
या दाव्यावाबत आम्ही दैनिक सकाळच्या स्थानिक वार्ताहराकडून माहिती घेतल्यानंतर असे कळाले की, एक्सवर केला जात असलेल्या दावा पूर्णपणे खोटा असून, देवदत्त निकम यांनी कोणत्याही प्रकारे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना पाठिंबा दिलेला नाही.
यावेळी आम्ही देवदत्त निकम यांचे अधिकृत एक्स अकाउंट तपासले असता त्यांनी 24 एप्रिल 2024 रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आजोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याची पोस्ट कली आहे.
वरील सर्व गोष्टी तपासल्यानंतर यातून हे निष्पन्न होते की, आंबेगावातील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आंबेगाव तालुक्यातील नेते देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना पाठिंबा दिलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.