Created By: Fact Crescendo
Translated By: Sakal Digital Team
नुकताच एका वर्तमानपत्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमर उजाला या वृत्तपत्रातील क्लिपिंगमध्ये पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचा हवाला देत म्हटले होते की, ”त्यांनी संन्यासी बनण्यासाठी घर सोडले नाही, दागिने चोरल्यामुळे नरेंद्र मोदींना घरातून हाकलून दिले होते.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोचे Archieve Version येथे पाहता येईल.
दरम्यान, Fact Crescendo या संकेतस्थलाने याबाबत सत्य तपासले असता त्यांना आढळले की, व्हायरल झालेला वृत्तपत्राचा फोटो बनावट आहे.
व्हायरल झालेल्या फोटोतील वृत्तपत्र प्रकाशित झाल्याची तारीख 2 जून 2016 आहे. म्हणून, Fact Crescendo ने 'अमर उजाला'ची 2 जून 2016 आवृत्ती शोधली. परिणामी, त्या तारखेला अमर उजालाच्या आवृत्तीची संग्रहित आवृत्ती सापडली. पण त्यामध्ये व्हायरल होत असलेल्या फोटोशी मिळती जुळती कोणतीही बातमी सापडली नाही.
पुढे Fact Crescendo ने, संबंधित कीवर्ड शोधल्यानंतर त्यांना अमर उजाला द्वारे 2 जून 2016 रोजी प्रकाशित केलेले एक स्पष्टीकरण सापडले. त्यामध्ये म्हटले होते की, “सोशल मीडियावर अमर उजालाच्या नावाने प्रल्हाद मोदीचा उल्लेख करून खोटी बातमी पसरवली जात आहे. अमर उजालाचा या बातमीशी काहीही संबंध नाही. अमर उजाला अशा फेक न्यूज पसरवण्याचा तीव्र निषेध करते. अमर उजालाच्या नावाने सोशल मीडियावर ही फेक न्यूज व्हायरल झाली आहे. अमर उजालातर्फे दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.”
अमर उजालाने दिलेल्या स्पष्टीकरणाचे Archieve Version येथे पाहता येईल.
याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने प्रल्हाद मोदी यांच्याशीही संपर्क साधला.
प्रल्हाद मोदी म्हणाले, “जेव्हा अमर उजाला मधील बातमी माझ्या लक्षात आली, तेव्हा मी त्यांच्या संपादकाशी संपर्क साधला आणि त्यांना विचारले की काय चालले आहे. कारण मी कधीही कोणाला भेटलो नाही किंवा मी असे कोणतेही विधान केलेले नाही. मी त्यांच्याविरुद्ध तक्रार करणार असल्याचे सांगितले. मग संपादकाने मला आश्वासन दिले की ते तक्रार दाखल करतील कारण हे खोटे आहे. त्यांनी मला एफआयआरची प्रतही पाठवली पण सध्या ती माझ्याकडे नाही. मात्र ही बातमी पूर्णपणे निराधार आहे. मी असे विधान कधीच केलेले नाही.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या तपासावरून आपण असे म्हणू शकतो की, व्हायरल झालेले वृत्तपत्राचे फोटो बनावट आहेत. अमर उजालाने कधीच अशा मथळ्याची बातमी प्रकाशित केली नाही आणि प्रल्हाद मोदींनीही असे कोणतेही विधान केले नाही.
'फॅक्ट क्रेसेंडो' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.