सोशल मीडियावर सध्या एक भयंकर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती खुर्चीवर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करताना दिसत आहे.
दरम्यान या व्हायरल व्हिडिओला धार्मिक रंग देण्याचे काम काही लोक करत आहेत. ते दावा करत आहेत की, एक मुस्लीम व्यक्ती नाशिकमधील डॉक्टरवर त्याच्याच रुग्णालयात कोयत्याने वार करत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पाडताळणी केल्यानंतर आम्हाला असे आढळले की, हा दावा खोट आहे. या व्हिडिओमधील आरोपी राजेंद्र मोरे नावाचा व्यक्ती हिंदू असून, त्याने पैशाच्या वादातून डॉक्टरवर हल्ला केला होता.
23 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिकच्या पंचवटी येथे चेस्ट फिजिशियन आणि क्रिटिकल केअर स्पेशलिस्टडॉ. कैलाश राठी यांच्यावर हल्ला झाला होता.
या घटनेचा त्रासदायक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे ज्यामध्ये हल्लेखोर डॉ. राठी यांच्यावर हल्ला करत अनेक वेळा कोयत्याने वार करताना दिसत आहे.
फेसबुकवर विजय महातो नावाच्या एका यूजरने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यासोबत लिहिले होते की, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जिहादी हल्लेखोराने डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे डॉ. राठी यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र आम्ही या घटनेबाबत माहीती गोळा केल्यानंतर हा दावा खोटा असल्याचे समोर आले. तसेच फेसबुकनेही हा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे.
जर तुम्हालाही सोशल मीडियावरील एखाद्या मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओबाबत शंका येत असेल, तर तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी PIB कडून त्याबाबतची सत्य परिस्थिती तपासू शकता.
यासाठी तुम्हाला PIB च्या अधिकृत वेबसाइट https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक +918799711259 किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेसेज किंवा व्हिडिओ पाठवून फॅक्ट चेक करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.