Fact Check: प्रभू श्रीरामांची प्रतिकृती हातात घेतलेला ओवेसींचा 'तो' फोटो एडिटेड

Asaduddin Owaisi: हा फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या व्हेरिफाईड फेसबुक अकाउंटवर एक फोटो सापडला. यामध्ये ओवेसींनी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती धरली नव्हती.
Fake News About Asaduddin Owaisi
Fake News About Asaduddin Owaisi Esakal
Updated on

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (MIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हातात प्रभू श्रीरामाची प्रतिकृती हातात धरलेला दाखवणारा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

हा फोटो खरा असल्याचा दावा पोस्टमध्ये केला जात असून, या फोटोवरुन त्यांची टिंगल केली जात आहे.

दरम्यान विश्वास न्यूजने या पोस्टची तपासणी केली असता हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. हा फोटो एडिटेड असून, वास्तविक ओवेसींनी हाहात आंबेडकरांचा फोटो धरला होता.

दावा

ही व्हायरल पोस्ट १४ मे रोजी अभय सिंग राजपूत (आर्काइव्ह) नावाच्या युजरने शेअर केली होती. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी काही लोकांसोबत उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांनी हातात प्रभू श्रीरामांची प्रतिकृती धरल्याचे दिसत आहे.

यावेळी युजरने लिहिले आहे की, "जेव्हा फा*** असे वाटते तेव्हा भलेभले लाइनवर येतात."

Edited Photo Of Asaduddin Owaisi
Edited Photo Of Asaduddin OwaisiEsakal
Fake News About Asaduddin Owaisi
Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

सत्य

हा फोटो यापूर्वीही एकदा व्हायरल झाला होता. त्यावेळीही विश्वास न्यूजने याची तपासणी केली होती. त्यावेळी विश्वास न्यूजने हा फोटो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केला आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या व्हेरिफाईड फेसबुक अकाउंटवर एक फोटो सापडला. यामध्ये ओवेसींनी रामाचे नव्हे तर आंबेडकरांची प्रतिकृती धरली होती.

या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “मोची कॉलनीतील दलितांनी #AIMIM पक्षाचे मुख्यालय #दारुस्सलम येथे #AIMIM अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली आणि त्यांच्या भागात (रामनसपुरा दिव बहादूरपुरा मतदारसंघ) विकास उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

ही पोस्ट असदुद्दीन ओवेसी यांच्या फेसबुक अकाउंटवरून ७ एप्रिल २०१८ रोजी पोस्ट करण्यात आली होती.

Original Photo Of Asaduddin Owaisi's Facebook Post
Original Photo Of Asaduddin Owaisi's Facebook PostEsakal
Fake News About Asaduddin Owaisi
Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

दरम्यान हा फोटो पहिल्यांदा व्हायरल झाला होता तेव्हा विश्वास न्यूजने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी हा फोटो एडिटेड असल्याचे सांगितले होते.

तसेत ओवेसी यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सही शोधली पण कुठेही प्रभू रामाच्या चित्रासोबत त्यांचा फोटो नव्हता.

निष्कर्ष

विश्वास न्यूजच्या तपासादरम्यान असे आढळले की, व्हायरल होत असलेला फोटो एडिटेड आहे. वास्तविक ओवेसींनी व्हायरल पोस्टमध्ये आंबेडकरांचा फोटो धरला होता.

'विश्वास न्यूज' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.