Fact Check: "ऋतुराजने माझा इगो हर्ट केला," गौतम गंभीरचा खोटा व्हिडिओ व्हायरल

Gautam Gambhir Viral News: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात, ऋतुराज गायकवाडने इगो हर्ट केल्याने त्याला श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले नाही असे गौतम गंभीर म्हणताना ऐकू येत आहे.
Screenshot Of X Post About Gautam Gambhir And Ruturaj Gaikwad
Screenshot Of X Post About Gautam Gambhir And Ruturaj GaikwadEsakal
Updated on

Gautam Gambhir Head Coach Of Indian Cricket Team: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने नुकतेच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. यानंतर श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली. गौतम गंभीरच्या प्रशिक्षक म्हणून असलेल्या पहिल्याच मालिकेत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात, ऋतुराज गायकवाडने इगो हर्ट केल्याने त्याला श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले नाही असे गौतम गंभीर म्हणताना ऐकू येत आहे.

काय आहे दावा?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने गौतम गंभीरचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, "ऋतुराज गायकवाडला संघातून का वगळले या बहुप्रतिक्षित प्रश्नाचे उत्तर गौतम गंभीरने अखेर दिले आहे."

या व्हिडिओमध्ये गंभीर म्हणत आहे की, "प्रत्येकजन विचारत आहे की, ऋतुराजला श्रीलंका दौऱ्यातून का वगळले? पण हे सर्व ऋतुराजनेच सुरू केले आहे. आधी त्याने थालाच्या वाढदिवसाचा पूर्वी 7 धावा केल्या. नंतर त्याच्या वाढदिवसाला त्याने 77 धावा केल्या. ही कसली वर्तणूक आहे. त्याला माझा इगो हर्ट करायचा होता."

एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Screenshot Of X Post About Gautam Gambhir
Screenshot Of X Post About Gautam Gambhir Esakal

काय आहे सत्य?

गौतम गंभीरचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला याबाबत शंका आली. त्यानंतर आम्ही व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स घेतले आणि गुगल रिव्हर्स सर्च केले. तेव्हा आम्हाला एएनआय या वृत्तसंस्थेच्या युट्युब चॅनलवर एक शॉर्ट व्हिडिओ सापडला. जो युएईतील अबुधाबीतील 10 जुलै 2024 रोजीच्या एका कार्यक्रमातील होता.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि एएनआयने पोस्ट केलेला व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की, यामधील बॅकग्राऊंड आणि गंभीरने घातलेला शर्ट एकसारखे आहेत. तसेच यामध्ये गंभीर ऋतुराज गायकवाडबद्दल काहीही आक्षेपार्ह बोलताना दिसत नाही.

Screenshot Of X Post About Gautam Gambhir And Ruturaj Gaikwad
Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

पुढे आणखी शोध घेतल्यानंतर युट्युबवर आम्हाला ज्यांनी अबुधाबीमध्ये गौतम गंभीरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या मेडियर हॉस्पिटल अबू धाबीच्या चॅनलवरील एक व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी तंतोतंज जुळत होत आणि यातही गंभीर ऋतुराजबद्दल काहीही आक्षेपार्ह बोलत नसल्याचे दिसते.

यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओ आणि मूळ व्हिडोसह गंभीर बोलत असलेल्या इतर व्हिडिओंची तुलना केल्यानंतर असे अढळले की, व्हायरल व्हिडिओती आवाज गंभीरच्या आवाजाशी जुळत नाही.

Screenshot Of X Post About Gautam Gambhir And Ruturaj Gaikwad
Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

निष्कर्ष

वरील या सर्व विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारे आम्हाला खात्री पटली की, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये गौतम गंभीरच्या आवाजाशी छेडछाड केली आहे. त्याचबरोबर गौतम गंभीर ऋतुराज गायकवाडला श्रीलंका दौऱ्यातून का वगळले याबद्दल काहीही बोलला नाही.

'शक्ति कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'सकाळ'ने याचे फॅक्ट चेक केले केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.