Fact Check: कोविशील्डची लस घेतलेल्यांना खरंच TTS होतो का? वाचा काय आहे व्हायरल दाव्यामागील सत्य

Covishield, Astra Zeneca: या बातमीनंतर Covishield, Astra Zeneca च्या Covid लसीला भारतात परवानगी दिल्याबद्दल अनेक सोशल मीडिया युजर्सनी मोदी सरकारला दोष देत अनेक पोस्ट केल्या आहेत.
Sakal, Fact Check
CovishieldSocial Media
Updated on

Created By: The Healthy Indian Project (THIP)

Translated By : Sakal Digital Team

आघाडीची लस निर्माती कंपनी Astra Zeneca ने आपल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये सांगितले आहे की, त्यांच्या कोविड लसीमुळे TTS होऊ शकते (अशी स्थिती ज्यामुळे रक्ताची गुठळी आणि प्लेटलेट संख्या कमी होऊ शकते).

या बातमीनंतर Covishield, Astra Zeneca च्या Covid लसीला भारतात परवानगी दिल्याबद्दल अनेक सोशल मीडिया युजर्सनी मोदी सरकारला दोष देत अनेक पोस्ट केल्या आहेत.

बहुतेक भारतीयांना आता टीटीएसचा धोका असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान द हेल्थी इंडियन प्रोजेक्टने केलेल्या तापासणीत सोशल मीडियावर केला जात असलेला दावा अर्धसत्य आहे. TTS चा धोका खरा असला तरी तो "अत्यंत दुर्मिळ" आहे.

दावा

आपल्या लसींमुळे लस घेणाऱ्यांना दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात, अशी माहिती AstraZeneca कंपनीने UK न्यायालयात दिलेल्या कागतपत्रांमधून समोर आली आहे.

दरम्यान, कोरोना कालावधीत भारतातही कोविशील्ड लस वापरण्यास मोदी सरकारने परवाणगी दिली होती. देशात कोविशील्ड लसींना परवानगी दिल्यामुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमचा (TTS) धोका निर्माण झाला आहे. यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा दावा करणाऱ्या अनेक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहेत.

दरम्यान एक्सवर एका युजरने दोन फोटो शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: कोवॅक्सिन लस घेतली आहे. पण त्यांनी कोव्हिशिल्ड लस इतरांना घ्यायला लावून 140 कोटी लोकांचा जीव संकटात टाकला आहे.

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Social Media Claim
Social Media ClaimEsakal

सत्य

कोविशील्डची लस घेतलेल्या भारतीयांना TTS होण्याचा धोका आहे का? हो, कोविशील्डची लस घेतलेल्यांना TTS होण्याचा धोका आहे. पण तो अत्यंत कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

हे स्पष्ट केले पाहिजे की भारतातील Covishield, AstraZeneca ची लसीचा, देशभरात मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. पण, गेल्या काही वर्षांत देशभरात आतापर्यंत टीटीएस ची मर्यादित प्रकरणे नोंदवली गेली आहेत. लसीकरणामुळे टीटीएस होऊन मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले असते, तर त्याची दखल नक्कीच घेतली गेली असती आणि प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेतली असते.

Sakal, Fact Check
Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) मुळे सर्व भारतीयांचा मृत्यू होण्याचा धोका आहे आणि हे सरकारचे अपयश आहे, असे म्हणणे म्हणजे संपूर्ण परिस्थितीची अतिशयोक्ती आणि दिशाभूल करणारे आहे.

The Healthy Indian Project (THIP) हा जागतिक आरोग्य संघटनेच्या लस सुरक्षा नेटचा (VSN) सदस्य आहे आणि लसींबद्दल अचूक माहिती प्रदान करतो.

आम्ही आधीही सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या अनेक COVID लसीकरण-संबंधित दाव्यांची अचूकता तपासली आहे. यामध्ये मुख्यतः लस विषारी, मेंदूसाठी हानिकारक आणि प्रतिबंधकांपेक्षा अधिक हानीकारक असल्याच्या दाव्यांचा समावेश होतो.

Sakal, Fact Check
Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

निष्कर्ष

गेल्या काही दिवसांपासून कोविशिल्ड लसीबाबत केले जात असलेले दावे अर्धसत्य असल्याचे The Healthy Indian Project ने केलेल्या सत्य तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे कोविशिल्डची लस घेतलेल्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. पण कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

'The Healthy Indian Project' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.