देशातील उत्तरेकडील राज्ये आणि पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांचे गेल्या तीन आठवड्यापासून आंदोलन सुरू आहे.
दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुरुद्वारामध्ये गेलेला एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोबाबत असा दावा केला जात आहे की, तो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान घेण्यात आलेला आहे. आणि धोनीने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
मात्र, आम्ही केलेल्या फॅक्टचेकमध्ये असे आढळून आले की, हा फोटो दोन वर्षे जुना म्हणजेच 2022 मधील असून, तो लंडनमधील एका गुरूद्वारामध्ये काढण्यात आला होता.
धोनीबाबत व्हायरल होत असलेल्या एक्सवरील या पोस्टमध्ये डॉ. निमो यादव कॉमेंट्री या पॅरोडी अकाउंटवर दावा करण्यात आला आहे की, महेंद्रसिंग धोनी निमंत्रण दिल्यानंतरही राम मंदिर प्राण प्रतिष्ठेसाठी नाही, परंतु शेतकरी आंदोलनादरम्यान त्याने आज गुरुद्वाराला भेट दिली आहे. MSD हा पाठीचा कणा असलेला माणूस आहे जो अजूनही धर्मनिरपेक्ष मूल्यांचे पालन करतो.
आम्ही केलेल्या तपासणीमध्ये असे आढळले की, हा व्हायरल फोटो पहिल्यांदा गुरप्रीत सिंग आनंद नावाच्या एका यूजरने 2022 मध्ये पोस्ट केला होता. जेव्हा एमएस धोनीने लंडनमधील सेंट्रल गुरुद्वाराला भेट दिली होती.
खालसा जाथा ब्रिटीश आयल्सचे अध्यक्ष असणाऱ्या आनंद यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये लंडन गुरुद्वाराला धोनीने भेट दिल्यानंतर हा फोटो एक्सवर पोस्ट केला होता.
या सर्वांवरुन असे सिद्ध होते की, एमएस धोनीने अलिकडील काळात कोणत्याही गुरुद्वाराला भेट दिलेली नाही. तसेत त्याने कोणत्याही प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला नाही.
जर तुम्हालाही सोशल मीडियावरील एखाद्या मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओबाबत शंका येत असेल, तर तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी PIB कडून त्याबाबतची सत्य परिस्थिती तपासू शकता.
यासाठी तुम्हाला PIB च्या अधिकृत वेबसाइट https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक +918799711259 किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेसेज किंवा व्हिडिओ पाठवून फॅक्ट चेक करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.