Created By: Logically facts
Translated By: Sakal Digital Team
मुंबई : सोशल मीडियावर आज तक या हिंदी न्यूज चॅनलच्या बातमीची क्लिप मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे, यात दावा केला आहे की मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्री करण्याणी अट 'जमियत-ए-इस्लामी' आणि 'रजा अकादमी' सारख्या मुस्लिम संघटनांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मते मिळवण्यासाठी मुस्लिम संघटनांनी फतवा जाहीर केला होता त्याबदल्यात महाविकास आघाडीपुढे पाच अटी ठेवण्यात आल्याचा दावा व्हायरल होत आहे.