Viral Video: इस्त्राइली सैन्याविरोधात पॅलेस्टिनी नागरिकाकडून चिमुकल्या मुलाचा शिल्ड म्हणून वापर; Fact Check

 A Palestinian citizen for Hamas uses his own son as a shield before members of the Israeli army  Fact Check of Viral Video
A Palestinian citizen for Hamas uses his own son as a shield before members of the Israeli army Fact Check of Viral Video
Updated on

तेल अवीव- इस्त्राइल आणि हमास संघटनेमध्ये तुंबळ युद्ध सुरु झाले आहे. त्यामुळे इस्त्राइल-पॅलेस्टिन वाद पुन्हा उग्र रुप धारण करत आहेत. संघर्षाचे वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत. सोशल मीडियावर अशा व्हिडिओंचा खच पडू लागला आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला असून यात एका पॅलेस्टिनी नागरिकाने आपल्या छोट्याशा मुलाचा इस्त्राइली लष्कराविरोधात शिल्ड (संरक्षक कवच) म्हणून वापर केल्याचं दिसत आहे.

इस्त्राइलचे लष्कर रस्त्यावर तैनात असताना एक पॅलेस्टिनी नागरिक आपल्या चिमुकल्या मुलासोबत तेथे येतो. त्यांच्या दोघांच्या हातात पॅलेस्टिनचा झेंडा दिसत आहे. पॅलेस्टिनी नागरिक छोट्या मुलाला पुढे करुन त्याला इस्त्राइली लष्कराला सामोरे जाण्यास सांगतो.

चिमुकला आपल्या हातातील झेंडा घेऊन इस्त्राइली लष्कराच्या पुढ्यात जाऊन उभारतो. यावेळी इस्त्राइली लष्कर त्याला कसलीही इजा करत नाहीत. उलट प्रेमाने त्याला प्रतिसाद देताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. (Fact Check of Viral Video A Palestinian citizen for Hamas uses his own son as a shield before members of the Israeli army)

 A Palestinian citizen for Hamas uses his own son as a shield before members of the Israeli army  Fact Check of Viral Video
Israel War: इस्त्राइल-हमास संघर्षातील 5 मोठे दावे निघाले खोटे; तुम्हालाही खरे वाटत होते का? जाणून घ्या

न्यू वर्ल्ड न्यूजने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ११ ऑक्टोंबर रोजी एक्स सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दीडलाखांपक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. तसेच अनेक जण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. पण, हा व्हिडिओ जुना असल्याचं समोर येत आहे.

हमासने शनिवारी इस्त्राइलवर हल्ला केला होता. तेव्हापासून हमास आणि इस्त्राइलमध्ये स्फोटक स्थिती आहे. सध्यातरी हा संघर्ष थांबण्याची चिन्ह नाहीत. या युद्धात आतापर्यंत ३५०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेत ५ हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यावरुन भीषण परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल.

 A Palestinian citizen for Hamas uses his own son as a shield before members of the Israeli army  Fact Check of Viral Video
Israel Hamas Conflict: हमास हल्ल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी इस्राइली अभिनेता सरसावला पुढे! युद्धाचा भयावह व्हिडिओ व्हायरल

पॅलेस्टिन आणि इस्त्राइल यांच्यातील संघर्ष तसा नवा नाही. दोन्ही देशांमध्ये छोट्या-मोठ्या चकमकी होत असतात. पण, शनिवारी झालेला हल्ला वेगळा होता. तो पूर्ण शक्तीनिशी केलेला अनपेक्षित हल्ला होता. त्यामुळे इस्त्राइलला मोठा धक्का बसला. आता इस्त्राइल प्रतिकार करत असून यामुळे गाझा पट्टीमध्ये विध्वंसाला सुरुवात झाली आहे. हमासला हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.