Fact Check: पंतप्रधान मोदींचे मराठा समाजाबद्दलचे अर्धवट विधान व्हायरल

PM Narendra Modi: "मागच्या दाराने ओबीसी आरक्षणाची लूट करणे, तुम्हाला मंजूर आहे का? मला तुम्ही सर्वांनी सांगा. तुम्ही सहमत आहात का?"
False Claim about PM Modi On Marathas
False Claim about PM Modi On MarathasEsakal
Updated on

Created By: The Quint

Translated By: Sakal Digital Team

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ज्यात दावा केला जात आहे की, पंतप्रधान मोदी मराठा समाजाच्या विरोधात बोलले आणि त्यांना 'लुटारू' म्हणले आहेत.

व्हिडिओबद्दल: 28 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना असे म्हणताना ऐकू येते की, "तुम्ही मला सांगा, तुम्हाला असा खेळ मान्य आहे का? मागच्या दाराने ओबीसी आरक्षणाची लूट करणे, तुम्हाला मंजूर आहे का? मला तुम्ही सर्वांनी सांगा. तुम्ही सहमत आहात का? या लोकांना हे देशात आणि राज्यात करायचे आहे.

'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

PM Modi About Maratha Community
PM Modi About Maratha Communityesakal
False Claim about PM Modi On Marathas
Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

हा दावा खरा आहे का?: नाही, पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ एडिट केलेला असून, त्यांची विधाने चुकीच्या पद्धतीने मांडली आहेत. त्यांचे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर कळते की, ते कर्नाटकातील मुस्लिमांना दिलेल्या ओबीसी आरक्षणाचा संदर्भ देत आहेत.

द क्विन्टने याबाबत सत्य शोधले असून, त्यांनी YouTube वर “PM Modi Maharashtra speech” हा कीवर्ड शोधला. तेव्हा द क्विन्टला एक व्हिडिओ सापडला ज्यामध्ये पीएम मोदींनी व्हायरल क्लिपमध्ये जे कपडे घातले आहेत तेच कपडे दिसत आहेत.

हा व्हिडिओ 7 मे रोजी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित झाला होता, ज्याचे शीर्षक आहे, "PM Modi यांनी बीड, महाराष्ट्र येथे जाहीर सभेला संबोधित केले."

त्यांच्या भाषणात ते इंडिया आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहेत.

सुमारे 13:42 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये पीएम मोदी म्हणतात, "तुम्हाला हे देखील माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना आरक्षणाचा अधिकार दिला होता. बाबासाहेबांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला होता. भारतात धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय संपूर्ण संविधान सभेने दीर्घ चर्चेनंतर घेतला होता.

पीएम मोदी पुढे म्हणाले, "पण, काँग्रेस पक्षाला दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून ते धर्माच्या आधारावर द्यायचे आहे." यावेळी त्यांनी कर्नाटकचे उदाहरण दिले.

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. तर ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यांनी (काँग्रेस) काय केले? रातोरात त्यांनी कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसी घोषित करणारा आदेश काढला. त्याचा परिणाम काय झाला? बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला राज्यघटना आणि संसदेने दिलेल्या २७ टक्के आरक्षणाने रातोरात मुस्लिमांना ओबीसी बनवून त्यात समाविष्ट केले. त्यांनी ते ओबीसींकडून लुटले. पूर्वी ओबीसींना मिळणाऱ्या लाभांपैकी एक मोठा हिस्सा मुस्लिमांना दिला."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील भाग

इथे पंतप्रधान मोदींना असे म्हणताना ऐकू येते की, "मला सांगा, तुम्हाला हा प्रकार मान्य आहे का? ओबीसी आरक्षण मागच्या दाराने लुटले जाचे, ते तुम्हाला ते मान्य आहे का? तुम्हाला ते मान्य आहे की नाही ते मला पूर्ण ताकदीने सांगा. या लोकांना देशात आणि राज्यात तेच करायचे आहे."

False Claim about PM Modi On Marathas
Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

X प्लॅटफॉर्मवरील भाजपच्या अधिकृत अकाउंटवर पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा तो भाग देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

निष्कर्ष:

पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा अपूर्ण भाग मराठा समाजाशी जोडून खोट्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.

'द क्विन्ट' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.