Fact Check: वाराणसीत 2019 मध्ये एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान नाहीच, सोशल मीडियावर खोटा दावा व्हायरल

Ravish Kumar: पत्रकार आण यूट्यूबर रवीश कुमार यांच्या नावाच्या पॅरोडी अकाउंटवरुन 'एक्स'वर एक पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघाबाबत आहे.
Fact Check| Ravish kumar| Varanasi Loksabha Constituency
Fact Check| Ravish kumar| Varanasi Loksabha ConstituencyEsakal
Updated on

पत्रकार आण यूट्यूबर रवीश कुमार यांच्या नावाच्या पॅरोडी अकाउंटवरुन नुकतेच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत, 'हे खरं आहे का?' असा प्रश्न विचारला आहे.

रवीश कुमार यांच्या पॅरोडी अकाउंटवरुन केलेली ही पोस्ट वाराणसी मतदार संघाबाबत आहे. ज्यामुळे इंटरनेटवर उलट सुलट दावे करण्यात येत आहेत. मात्र निवडणूक आयोगाने पुढे येत एक्सवरून याबबतचे सत्य सर्वांसमोर मांडले आहे.

निवडणूक आयोगाने आपल्या ऑफिशियल एक्स अकाउंटवर या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्हिडिओतील दावे खोटे असल्याचे सांगितले आहे.

काय आहे दावा?

दावा क्र. 1: वाराणसी लोकसभा मतदारसंघात 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या आणि झालेल्या एकूण मतदानाच्या आकडेवारीत खूप तफावत आहे.

सत्य: हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. वाराणसीतील एकूण मतदारांची आकडेवारी 18,56,791 होती. तर मतदान झालेल्या मतांची आकडेवारी 10,58,744 होती. तसेच पोस्टल मतांची संख्या 2085 होती. या सर्वांची बेरीज केल्यास ही आकडेवारी एकूण मतदारांपेक्षा जास्त होत नाही.

एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Fact Check| Ravish kumar| Varanasi Loksabha Constituency
Fact Check: नरसिंह राव यांना 'भारतरत्न' प्रदान करताना मल्लिकार्जून खर्गे यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत हा दावा खोटा

दावा 2: निवडणूक आयोगाच्या एका पत्राचा दाखला देत एका दावा केला जात आहे की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 373 लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार आणि पडलेल्या मतांमध्ये अंतर असल्याचे अढळले आहे.

सत्य: सोशल मीडियावर केला जात असलेला हा दावाही खोटा आणि भ्रामक आहे. निवडणूक आयोगाने असे कोणतेही पत्र जारी केले नाही. मतदार आणि झालेल्या मतदानांमध्ये कोणतेही अंतर नाही.

Fact Check| Ravish kumar| Varanasi Loksabha Constituency
Fact Check: ANI च्या व्हिडिओमध्ये 'एमडीएमके' चे संस्थापक वायको यांनी फक्त काँग्रेसवर टीका केली नाही, अर्धवट व्हिडिओ होतोय व्हायरल

निष्कर्ष

निवडणूक आयोगाने एक्सवर स्पष्टीकरण देत दिलेल्या पुराव्यांवरुन हे सिद्ध होते की, रवीश कुमार पॅरोडी अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करत विचारलेल्या प्रश्नामध्ये कोणतेही तथ्थ नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात एकूण मतदार आणि झालेल्या मतदानामध्ये कोणतेही अंतर नाही.

तसेच निवडणूक आयोगाने एक्सवरील आणखी एका पोस्टमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 373 मतदारसंघातील एकूण मतदार आणि झालेल्या मतदानामध्ये कोणतेही अंतर नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.