Fact Check: लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीसांची गाडी चालवत असल्याचा दावा खोटा; फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

Devendra Fadnavis-Laxman Hake: लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सरकार अन् देवेंद्र फडणवीस प्रेरित असल्याचा दावा करणारे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Fake Claim About Laxman Hake And Devendra Fadnavis
Fake Claim About Laxman Hake And Devendra FadnavisEsakal

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी नुकतेच उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते.

अशात हाके यांचे हे आंदोलन सरकार अन् देवेंद्र फडणवीस प्रेरित असल्याचा दावा करणारे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण ई-सकाळने यामागील तथ्थ्य तपासले असता, सोशल मीडियावर केले जात असलेले दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.

दावा

एक्सवर एका युजरने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडवणवीस एका गाडीत बसल्याचे दिसत आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचा चालक आहे.

हा फोटो पोस्ट करताना युजरने लिहिले आहे की, "हा व्हिडिओ एका महिन्यापूर्वीचा असून हाके त्यांचा मालकासोबत आहे. मनोज जरांगे बोलत होते की हे आंदोलन करकार प्रेरित आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस, विधानसभा निवडणुकीत तुमची सगळीच जिरवू."

'फेसबुक'वरील (Facebook) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

देवेंद्र फडणवीस आणि लक्ष्मण हाके यांच्याबाबत दिशाभूल करणारी पोस्ट.
देवेंद्र फडणवीस आणि लक्ष्मण हाके यांच्याबाबत दिशाभूल करणारी पोस्ट.Esakal
Fake Claim About Laxman Hake And Devendra Fadnavis
Fact Check: उत्तर प्रदेशात भाजपला मत न दिल्याने दलितांवर हल्ला केल्याचा दावा खोटा

सत्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा हा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, भाजपचे पदाधिकारी संजय उपाध्याय यांनी एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी व्हायरल होत असलेल्या फोटोमागील सत्य सांगितले.

संजय उपाध्याय आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, " देवेंद्र फडणवीस अयोध्येत दर्शानासाठी आले होते त्यावेळी त्यांची सर्व व्यवस्था माझ्याकडे होती. या संपूर्ण प्रवासात मी त्यांच्यासोबत होतो. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेला व्यक्ती हा लक्ष्मण हाके नाहीत तर उत्तर प्रदेशातील चालक दीपक कुमार आहेत."

यावेळी संजय उपाध्याय यांनी फडणवीसांची गाडी चालवत असलेल्या दीपक कुमार यांचे ड्राईव्हिंग लायसन्सही पोस्ट केले आहे.

यावेळी आम्ही व्हायरल होत असलेला फोटो गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केला तेव्हा आम्हाला देवेंद्र फडणवीस यांची 30 मे 2024 ची एक्स पोस्ट सापडली. त्यामध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत "श्री राम जी की जन्मभूमि पर आने मात्र से जीवन धन्य होने समान है।" असे कॅप्शन दिले आहे.

Fake Claim About Laxman Hake And Devendra Fadnavis
Fact Check: प्रशांत किशोर यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड झाल्याचा दावा खोटा, फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या व्हायरल फोटो आणि व्हिडिओबद्दल आम्ही आणखी शोध घेतल्यानंतर आम्हाला एएनआय या वृत्तसंस्थेचे 30 मे 2024 ची एक्स पोस्ट सापडली. त्या पोस्टमध्ये एएनआयने म्हटले आहे की, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात पूजा केली."

निष्कर्ष

लक्ष्मण हाके आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्याबाबत ई-सकाळने सत्य तपासले. तेव्हा आम्हाला आढळले की, देवेंद्र फडणवीस यांची गाडी चालवणारा व्यक्ती लक्ष्मण हाके नसून दीपक कुमार आहेत.

'शक्ति कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'सकाळ'ने हे फॅक्ट चेक केले केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com