Fact Check: मनोज जरांगेंनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्याचा दावा खोटा; वाचा व्हायरल व्हिडिओमागिल सत्य

Manoj Jarange Patil Tomb Of Aurangzeb: सोशल मीडियावरील दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही या व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा आम्हाला या दाव्यामागील सत्य सापडले.
Fake X Post About Manoj Jarange Patil Visited Tomb Of Aurangzeb
Fake X Post About Manoj Jarange Patil Visited Tomb Of Aurangzeb Esakal
Updated on

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. वर्षभर राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाज मोठ मोठी आंदोलने करत आहे. अशात सोशल मीडियावरुन मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी खोटे दावे करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा केला जात आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट देत त्यावर चादर चढवली आहे.

मात्र, ई-सकाळने या दाव्याबाबतचे सत्य तपासल्यानंतर हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

काय आहे दावा?

'एक्स'वर एका युजरने व्हिडिओ पोस्ट करत दावा केला आहे की, मराठा आरक्षणाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली. यावेळी त्यांनी औरंजेबच्या कबरीवर चादर चढवली आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना युजरने लिहिले आहे की, "देव, देश आणि धर्मा पेक्षा माझ्यासाठी कोणीही मोठा नाही! ज्या औरंग्याने माझ्या राजाला पंधरा दिवस छळ करून मारले, त्याच्या कबरीवर चादर चढवणारा कितीही मोठा असला तरी तो मला नकोय!"

एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Manoj Jarange Patil Visited Tomb Of Aurangzeb Fake News
Manoj Jarange Patil Visited Tomb Of Aurangzeb Fake NewsEsakal

काय आहे सत्य?

सोशल मीडियावरील दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही या व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा आम्हाला एक इन्स्टाग्राम पोस्ट सापडली त्यामध्ये एक व्हिडिओही शेअर केला आहे. आणि लिहिले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील नेकनूर गावात असलेल्या सय्यदशाह इब्राहीम दर्गाहवर चादर चढवली. यावरुन स्पष्ट होते की जरांगे पाटील यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिलेली नाही.

दरम्यान मनोज जरांगे यांच्या खोट्या दाव्यासह पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक्सवर अनेक युजर्सनी हा दावा खोटा असल्याचा सांगणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

यावेळी एक युजर पोस्ट करत म्हणाला, ही फेक न्यूज आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जरांगे यांनी औरंगजेबच्या कबरीला नव्हे तर नेकनूर येथील सय्यदशाह इब्राहीम दर्ग्याला भेट दिली आहे.

दुसऱ्या एका युजरनेही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दावा खोडून काढत म्हटले की, "आज एका अति शहाण्याने जरांगे पाटलांचा नेकनूर येथील दर्ग्यावरचा फोटो शेयर करुन, तो फोटो औरंगजेबच्या कबरीवरचा असल्याचा खोटा दावा केला. जरांगे पाटलांबद्दल इतका द्वेष का?

Fake X Post About Manoj Jarange Patil Visited Tomb Of Aurangzeb
Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल
Fake X Post About Manoj Jarange Patil Visited Tomb Of Aurangzeb
Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

निष्कर्ष

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट देत चादर चढवल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असून, व्हायरल होत असलेला व्हिडिओ जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील नेकनूर गावातील सय्यदशाह इब्राहीम दर्ग्याला भेट दिली होती तेव्हाचा आहे.

'शक्ति कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'सकाळ'ने याचे फॅक्ट चेक केले केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.