Fire Panipuri : फायर है मैं! फायर पाणीपुरीने सोशल मिडियावर लावली आग; पहा व्हिडीओ!

फायर पाननंतर सोशल मिडियावर पाणीपुरीचा ट्रेंड
Fire Panipuri
Fire Panipuriesakal
Updated on

तूम्ही फायर पान ऐकले असेल, किंवा खाल्लेही असेल. पण, तूम्ही कधी फायर पाणी पुरीबद्दल ऐकले आहे का? सोशल मिडीयावर या पाणीपुरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुझफ्फरपूरमध्येही फायर पान नंतर आता फायर पाणीपुरी लोकप्रिय झाली आहे. फायर पान ट्राय केलेल्या लोकांना ही अनोखी पाणीपुरी आकर्षित करीत आहे.

मुझफ्फरपूरमधील पिंटू कुमार यांचे हा पाणीपुरीचा स्टॉल आहे. ते त्यांच्या स्टॉलवर फायर पाणीपुरी ग्राहकांना खायला घालतात. या स्टॉलच्या मालकांनी सांगितले की, मी अहमदाबादमध्ये हे फायर पाणीपुरी बनवण्याचा ट्रेंड पाहिला आणि शिकला. त्यानंतर मी झफ्फरपूरमध्येही स्वतःचे दुकान का काढू नये, असा विचार माझ्या मनात आला. (Food)

Fire Panipuri
Food culture : खाद्य संस्कृती जपणारे डोंगरी मीठ

मी स्वत:चा स्टॉल सुरू केला आणि इथे मला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोक फायर पाणीपुरी खाण्यासोबतच त्याचे फोटोही सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यामूळे अधिक लोक माझ्याकडे येत आहेत, असेही पिंटू यांनी सांगितले.

Fire Panipuri
Coconut Paneer Recipe : घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ही झटपट बनणारी खास डिश, पाहुणेही म्हणतील वाह..

कशी बनते फायर पाणी पुरी

या पाणी पुरीमध्ये पाणी नसते तर त्यात कापूर असतो. त्याच्या मदतीने दुकानदार तो पेटवतो. सोशल मीडियावर लोक याच्या धोक्याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हिडीओ शेअर करणाऱ्या फूड ब्लॉगरचे म्हणणे आहे की फायर पाणी पुरी पूर्णपणे सुरक्षित आहे. ते खाताना तोंड भाजत नाही. त्याची चवही अप्रतिम आहे.

Fire Panipuri
Thums Up Panipuri : 'थम्स अप पाणीपुरी' चा व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्सकडून मात्र...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.