सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अशात सोशल मीडियावर अनेक खोटे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
दरम्यान सोशल मीडियावर असेच काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दाव्या करण्यात येत आहे की, मुंबईमध्ये प्रचारावेळी भाजपच्या प्रचार किटमध्ये सोन्याची बिस्किटे आढळली आहेत. तसेच प्रत्येक मतदाराला भाजपकडून सोन्याचे बिस्किट वाटण्यात येत आहेत. (Mumbai BJP Gold Biscuit)
एक्सवर एका युजरने व्हिडिओसह एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, "भाजप महाराष्ट्रात काय करत आहे पाहा. मुंबईतील घाटकोपरमध्ये भाजपच्या प्रचार किटमध्ये भाजपचे पोस्टर, बॅनर आणि एक सोन्याचे बिस्किट आहे. भाजप आणि मोदी-शहांचा 400 जागा जिंकण्यासाठी हा प्लॅन आहे का?"
'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.
दरम्यान सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्याबाबत 'द क्विन्ट' या संकेतस्थळाने याबाबत सत्तता तपासली. त्यानंतर हा दावा खोटा असल्याचे त्यांना आढळले. कारण व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात एक प्लास्टिकची परफ्यूमची बाटली दिसत आहे, जी सोन्याचे बिस्किट म्हणून दाखवली जात आहेत.
हे सत्य शोधण्यासाठी 'द क्विन्ट'ने', 'गोल्ड बिस्किट बीजेपी किट मुंबई' वापरून Google वर संबंधित कीवर्ड शोधला, तेव्हा त्यांना 11 मे ची NDTV ची बातमी सापडली.
या बातमीमध्ये उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे किट दिसत आहे, ज्यामध्ये पोस्टर, बॅनर आणि प्लास्टिकच्या परफ्यूमची बाटली आहे.
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, जेव्हा व्हायरल व्हिडिओ शूट केला जात होता तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तासनतास थांबायला लावले होते. तेव्हा संतापून ते व्यंग्यात्मक स्वरात ते परफ्यूमच्या बाटलीला सोन्याचे बिस्किट म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.