सोशल मीडियामुळे लोक एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत. एखादी गोष्ट फोटो व्हिडीओसहीत पाठवणे व्हॉट्सअपवर सहज शक्य होते. एखाद्याशी व्हिडीओ कॉलवर बोलणे अगदी सोपे झाले आहे. पण, असे असले तरी त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.
सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या व्हायरल केल्या जातात. व्हॉट्सअॅप देखील त्याला अपवाद नाही. यावरही अनेक फेक न्यूज व्हायरल होत असतात. आज पत्रकार दिन आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी आजच्याच दिवशी दर्पण या मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्राची सुरूवात केली होती. याचसाठी पत्रकार दिन साजरा केला जातो.
याच दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आयडीया पाहुयात ज्याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सऍपच्या फेक न्यूज ओळखू शकता. त्या फॉरवर्ड करण्यापासून रोखू शकता.
सर्च करा
एखादी बातमी व्हायरल होऊन तूमच्यापर्यंत पोहोचली तर ती खरी आहे का हे तपासा. तुम्हाला आलेल्या मेसेजची सतत्या तुम्ही गुगलवर सर्च करून चेक करू शकता. कुठलाही मेसेज दुसऱ्यांना फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्यता तपासून पाहा.
वेबसाईट पहा
तूम्हाला मिळालेल्या माहितीच्या खाली जर सोर्स उपलब्ध असेल तर तो तपासा. लिंक किंवा ब्लॉगची माहिती असेल तर ते खात्रीशीर आहे का ते तपासा. जेव्हा तुम्ही कुठलीही माहिती ऑनलाइन वाचत असाल तर हेही जरूर बघा की, ती माहिती कुणी प्रसिद्ध केली आहे?
तारीख पहा
अनेकवेळा जुन्या पोस्ट व्हायरल होत असतात. त्या चेक करा. त्यावर तारीख नसेल तर गुगलवर त्याबद्दल माहिती नक्की मिळते. ती शोधा आणि खोटी माहिती आहे असे वाटल्यास इतरांनाही जागृत करा.
विश्वास ठेऊ नका
कोणतीही माहिती मिळाल्यावर त्यावर लगेचच विश्वास ठेऊ नका. खात्री करा. पोलिस मित्रांना विचारा. खात्री असेल तरच फॉरवर्ड करा. अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारण्यांच्या मृत्यूबद्दल अनेक फेक न्यूज व्हायरल होतात. नुकतेच मराठीतील ज्येष्ट अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या तीन दिवस आधी पासूनच लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अशा भावनिक प्रसंगी व्हायरल होणाऱ्या बातम्या पाहून त्यांच्या कुटुंबातील लोकांची अवस्था वाईट बनली होती.
आर्थिक नुकसान टाळा
अनेकदा संप, बंद अपघात किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करण्याचे खोटे संदेश व्हायरल केले जातात. एखाद्याला ऑपरेशनसाठी पैशांची गरज आहे, त्याचा अकाऊंट नंबर बॅंक डिटेल्सची माहिती दिली जाते. त्यावर विश्वास ठेऊन लोक पैसे पाठवतात. अशावेळी खरच त्या व्यक्तीला पैशाची गरज आहे का?, असे तपासल्या शिवाय पैसे पाठवू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.