Viral Video: काय सांगता! मगरीच्या तोंडातून चक्क जिवंत व्यक्ती आला बाहेर; काय आहे व्हिडिओचं सत्य?

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांनीही बोट तोंडात घालून घेतलं. या व्हिडिओबाबत वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. पण, व्हिडिओ मागे वेगळंच सत्य असल्याचं समोर येत आहे.
Viral Video
Viral VideoSakal
Updated on

नवी दिल्ली- मगरीची भीती जवळपास सगळ्यांनाच वाटते. त्यातल्या त्यात मगरीचा आकार मोठा असल्यास तर धडकीच भरते. त्यामुळे कोणीही मगरीच्या जवळ देखील जाण्याचा प्रयत्न करत नाही. पण, सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चक्क मगरीच्या तोंडातून एक जिवंत व्यक्त बाहेर येताना दिसत आहे. (Video Of Man Coming Out Of Crocodile Jaw Alive Goes Viral what is The Truth)

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांनीही बोट तोंडात घालून घेतलं. या व्हिडिओबाबत वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. पण, व्हिडिओ मागे वेगळंच सत्य असल्याचं समोर येत आहे. व्हिडिओ नीट पाहिला तर कळून येतंय की काहीतरी घोळ आहे. कारण, मगरीच्या मुखातून जीवंत व्यक्ती कोणतीही इजा न होता बाहेर येणे हे जवळपास अशक्य आहे किंवा चित्रपटामध्येच शक्य आहे.

व्यक्तीवर मगरीचा हल्ला झाला असेल असं व्हिडिओ पाहून वाटतं, पण, व्यक्ती ज्या मगरीच्या तोंडातून बाहेर येतो ते चक्क रोबोट आहे. प्लॅस्टिक आणि रबराचा वापर करुन ही मगर बनवण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा आणि कलेचा वापर करुन मगरीला खरे रुप देण्याचा प्रयत्न झाला आहे. व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक केलं जातं आहे.

Viral Video
Lays Viral Video : '25% टक्के एक्स्ट्रा' लिहिलेल्या लेझच्या पाकिटात मिळाले फक्त दोनच चिप्स! व्हिडिओ होतोय व्हायरल

नेटकऱ्यांचाही व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. मगर अगदी खरी वाटते आणि व्यक्तीचा खराच जीव वाचलाय असं वाटतं. पण, मगरीला खरं वाटेल असं रुप देणाऱ्याला सलाम, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. एकाने म्हटलं की, लोकांना घाबरवण्यासाठी हे एक चांगले खेळणे आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं की, ही रोबोट मगर आहे. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.