Viral Video : 150 हून अधिक मांजरांची आई आहे एक कुत्रा; पोस्ट पाहून येईल रडू

तो मांजरीला स्वतःच्या बाळांप्रमाणे वागवतो
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Viral Video : माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे आपल्याला जरी जमत नसलं. तरी प्राणी हे तंतोतंत पाळतात. याचेच उदाहरण इंटरनेटवर पहायला मिळत आहे. एक कुत्रा एक-दोन नव्हे तर तब्बल १५० मांजरांची आई बनला आहे.

रस्त्यावर सोडून दिलेल्या एखाद्या बाळालाही लोक दुर्लक्ष करतात. मायेच्या उबेसाठी आसुसलेल्या तान्ह्या जीवाला कोणी साधं हातातही घेत नाही. पण, मांजरीच्या रस्त्यावर सोडून दिलेल्या पिलांची एक कुत्रा काळजी घेत आहे.  

Viral Video
CRPF Dogs : पोलिस दलांच्या दिमतीस लवकरच देशी श्वान! ‘रामपूर हाउंड’, ‘हिमाचली शेफर्ड’, ‘बकरवाल’ होणार तैनात

अनेक मांजरी पाळण्यात मालकाला मदत करणाऱ्या कुत्र्याची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो मांजरीच्या पिल्लांना स्वतःच्या मुलांप्रमाणे ट्रिट करत आहे. या कुत्र्याने त्याच्या मालकाला 150 हून अधिक मांजरी पाळण्यात मदत केली.

तो मांजरीच्या पिल्लांना स्वतःच्या बाळांप्रमाणे वागवतो. त्यांच्यावर मुलांसारखे प्रेम करतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या कुत्र्याची कहाणी समजल्यानंतर अनेक लोक भावूक होत आहेत.

Viral Video
Dog Bite : अडीच वर्षात ४२ हजार जणांना कुत्र्याचा चावा

सोशल मीडिया पोस्टनुसार या कुत्र्याचे नाव रायन आहे. तिने 150 हून अधिक मांजरीचे पिल्लू पालन करण्यास मदत केली आहे. एकेकाळी त्याला स्वतःला घराची गरज होती. दहा वर्षांपूर्वी तो एका आश्रयस्थानात होता. त्याच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी त्याला लॉरा नावाच्या महिलेने दत्तक घेतले होते.

लॉराला मांजर पाळण्याची आवड आहे. लॉरा म्हणते की, मी त्याला प्रशिक्षित केले नाही. पण तो माझ्याकडे पाहून सर्वकाही करायला शिकला. रायन मांजरीच्या पिल्लांना फिरायला घेऊन जातो. तो त्यांच्यावरील प्रेम त्यांचे तोंड चाटून करतो. तो त्यांना आपल्याच असल्याप्रमाणे वागवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.