Fact Check: प्रशांत किशोर यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड झाल्याचा दावा खोटा, फेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Prashant Kishor BJP Spokeperson: या फोटोसोबत युजरने कॅप्शन दिले आहे की, "प्रशांत किशोर हे आरएसएससाठी काम करणारे एक पात्र आहे आणि हे फार पूर्वीपासून माहीत होते आता त्यांचे नाटक संपले."
Fake News About Prashant Kishore Appointed As BJP Chief Spokeperson.
Fake News About Prashant Kishore Appointed As BJP Chief Spokeperson.Esakal

देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यातील सहाव्या टप्प्याचे मतदान 25 मे रोजी तर सातव्या टप्प्याचे मतदान 1 जून रोजी होणार आहे.

यादरम्यान देशभरात सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे. राजकीय पक्ष, नेते आणि त्यांचे कार्यकर्ते ऐकमेकांवर जोरदार आरोपांच्या फैरी झाडत आहेत. अशात विरोधकांवर आरोप करताना मोठ्या प्रमाणात खोटी माहितीही पसरवली जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (Post Claiming, Prashant Kishore Appointed As BJP Chief Spokeperson.)

दावा

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये म्हटले आहे की, "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी प्रशांत किशोर यांची भाजपचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे."

या फोटोसोबत युजरने कॅप्शन दिले आहे की, " शेवटी मांजर बाहेर आली. प्रशांत किशोर भाजपसोबत आहेत. प्रशांत किशोर हे आरएसएससाठी काम करणारे एक पात्र आहे आणि हे फार पूर्वीपासून माहीत होते आता त्यांचे नाटक संपले."

'एक्स'वरील (X) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Post Claiming, Prashant Kishore Appointed As BJP Chief Spokeperson.
Post Claiming, Prashant Kishore Appointed As BJP Chief Spokeperson.Esakal
Fake News About Prashant Kishore Appointed As BJP Chief Spokeperson.
Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

सत्य

सोशल मीडियावर प्रशांत किशोर यांची भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याच्या दाव्याबाबत ई सकाळने पाडताळणी केली. यामध्ये असे समोर आली की, सोशल मीडियावर केला जात असलेला दावा पूर्णपणे खोटा आहे.

कारण, प्रशात किशोर यांच्या जन सुराज्य संघटनेच्या एक्स उकाउंटवर सोशल मीडिया युजर्स करत असलेल्या दाव्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच प्रशांत किशोर यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

Fake News About Prashant Kishore Appointed As BJP Chief Spokeperson.
Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

यावेळी जन सुराज्य संघटनेने काँग्रेसचे काँग्रेस पक्षाचे कम्युनिकेशन प्रमुख जयराम रमेश यांनी ही फेक न्यूज पसरवल्याचा आरोप केला आहे.

याबरोबर जन सुराज्य संघटनेने एक स्क्रीन शॉटदेखील शेअर केला आहे. ज्यामध्ये जयराम रमेश यांचे चॅट आहे. व ते फेक फोटो कोणालातरी पाठवत असल्याचे दिसत आहे, असे असले तरी स्क्रीनशॉमधील चॅट जयराम रमेश यांचाच आहे याला आम्ही दुजोरा देत नाही.

प्रशांत किशोर यांच्याबाबत केला जाणारा हा दावा खोटा आहे असे म्हणण्यास आणखी एक वाव आहे, कारण भारतीय जनता पक्ष प्रत्येकवेळी त्यांनी केलेल्या नियुक्तीबाबत सोशल मीडियावरून माहिती देत असतो. त्यामुळे आम्ही प्रशांत किशोर यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केल्याची कोणती माहीती दिली आहे का? त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर शोधले असता असे काहीही आढळले नाही.

निष्कर्ष

सोशल मीडियावर प्रशांत किशोर यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड केल्याचा दावा खोट आहे. याबाबत प्रशांत किशोर यांची संघटना जन सुराज्यने याबाबत एक्सवर स्पष्टीकरण दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com