Ashadhi Ekadashi 2023: चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी... पहा विठूरायाचे खास अभंग

पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे.
Ashadhi Ekadashi 2023
Ashadhi Ekadashi 2023sakal
Updated on

पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे. 'वारी' म्हणजे पंढरीचीच! तिरुपती, काशी या तीर्थक्षेत्रांच्या भेटींना वारी म्हटले जात नाही. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडीसमवेत गात, नाचत, गर्जत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद, जीवन धन्य करणारा अनुभव आहे. आज आम्ही तुम्हाला 5 अभंग सांगणार आहोत.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...

  • सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

    कर कटावरी ठेवोनिया

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

  • तुळसीहार गळा कासे पितांबर

    आवडे निरंतर हेची ध्यान

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

  • मकर कुंडले तळपती श्रवणी

    कंठी कौस्तुभ मणी विराजित

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

  • तुका म्हणे माझे हेची सर्व सुख

    पाहीन श्रीमुख आवडीने

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

  • सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

    कर कटावरी ठेवोनिया

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

धरिला पंढरीचा चोर...

  • धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर

    गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर

    धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर

  • ह्रदय बंदी खाना केला

    आत विट्ठल कोंडिला

    शब्दी केलि जड़ा जोड़ी

    विट्ठल पायी घातली वेडी

    धरिला पंढरीचा चोर..

  • सोहम शब्दांचा मारा केला

    विट्ठल कौकोड़ी ला आला

    जनि मने का विट्ठला

    जिवे न सोडी मी रे तूला

    धरिला पंढरीचा चोर

  • धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर

    गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर

    धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर

विठ्ठलाच्या पायी वीट...

  • विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

    पहाताच होती दंग आज सर्व संत

    विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

  • युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी

    धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी

    अनाथांचा नाथ हरी असे दयावंत

    विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

  • कुठली ती होती माती कोण तो कुंभार

    घडविता उभा राही पहा विश्वंभर

    तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत

    विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

  • पाहुनिया विटेवरती विठू भगवंत

    दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत

    गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ

    विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

माझे माहेर पंढरी...

  • माझे माहेर पंढरी,

    आहे भीवरेच्या तीरी

  • बाप आणि आई,

    माझी विठठल रखुमाई

    माझे माहेर पंढरी ...

  • पुंडलीक राहे बंधू,

    त्याची ख्याती काय सांगू

    माझे माहेर पंढरी ...

  • माझी बहीण चंद्रभागा,

    करीतसे पापभंगा

    माझे माहेर पंढरी ...

  • एका जनार्दनी शरण,

    करी माहेरची आठवण

    माझे माहेर पंढरी ...

चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी...

  • चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी

    दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी

  • जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी

    पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी

  • नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला

    टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी

  • संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई

    रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.