Ashadhi Ekadashi 2023 : वारी चुकली? हरकत नाही, मुंबईतील पंढरीत घ्या विठ्ठलाचे दर्शन; इथे आहे मुंबईची पंढरी

Vitthal Mandir in Mumbai: तुमची यंदाची वारी चुकली असेल तर वाइट वाटून घेऊ नका. मुंबईत वसलेल्या विठूरायाचे दर्शन तुम्हाला घेता येईल
Ashadhi Ekadashi 2023 Vitthal Mandir in Mumbai
Ashadhi Ekadashi 2023 Vitthal Mandir in Mumbaiesakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2023 : संतांनी त्यांच्या अभंगात असे वर्णन केलेले आहे की 'देव ही पंढरी आणि आत्मा पांडुरंग'. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहाते ते विठ्ठलाचे रूप. हिंदू धर्मात आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते.

यंदा आषाढी एकादशी आज म्हणजे २९ जूनला आहे. महाराष्ट्रात पंढरीच्या वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र तुमची यंदाची वारी चुकली असेल तर वाइट वाटून घेऊ नका. मुंबईत वसलेल्या विठूरायाचे दर्शन तुम्हाला घेता येईल.

विठ्ठल भक्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात. तसेच चंद्रभागेच्या तिरी जाऊन स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. कितीतरी गावांतील दिंड्यांनी पंढरपूर गजबजलेले तुम्हाला दिसेल.

मात्र वयोवृद्धांना किंवा काही आरोग्याच्या समस्येमुळे प्रत्येकाला पंढरीला जाणे शक्य होत नाही. तुमचीही यंदाची वारी चुकली असेल तर मुंबईच्या पंढरीला जाऊन तुम्हाला दर्शन घेता येईल.

मुंबईत या ४ ठिकाणी आषाढी एकादशी दणक्यात साजरी केली जाते. चला तर मग हे मुंबईचे पंढरपूर नेमके आहे कुठे ते जाणून घेऊयात. (Vitthal Mandir in Mumbai)

१) विठ्ठल रखुमाई मंदिर - वडाळा (Vitthal Rukmini Mandir Wadala)

हे मंदिर सुमारे ४०० वर्ष जुने आहे. या मंदिराने वडाळ्याला नवी ओळख दिली आहे. या मंदिराला प्रति पंढरपूर असेही म्हणतात. एकेकाळी मुंबईतील सात बैटांपैकी एक बेट म्हणून ओळखले जाणारे आणि मिठागरांसाठी ओळखला जाणारा वड्याळाचा हा भाग.

एकदा मिठागरांत काम करताना कामगारांना या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची मूर्ती सापडली. आणि नंतर या ठिकाणी मंदिर स्थापन करण्यात आले. एकादशीच्या दिवशी या ठिकाणी मेळावाही भरतो.

पत्ता - हे मंदिर वडाळा बस डेपोजवळ, सेंट्रल रेल्वे कॉलनी, कात्रज रोड वडाळा येथे आहे.

Ashadhi Ekadashi 2023 Vitthal Mandir in Mumbai
Ashadhi Ekadashi 2023 : अशी सुरेख रांगोळी पाहून आषाढी एकादशीला विठोबा तुमच्या घरी नक्की येणार! 

२) विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट - सायन (Vitthal Rukmini Mandir Sion)

हे मंदिर १२५ वर्ष जुने आहे. येथे विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची स्थापना ही १८९३ साली करण्यात आली होती. अशी आख्यायिका आहे की श्री दामोदर खरे महाराज हे १८६० साली मुंबईत आले व शिवगावात स्थित झाले. एकदा ते पंढरीत गेले असता तेथील सोहळा बघून प्रभावित झाले.

घरी परतताना त्यांची धामूर्ती आणल्या, या मूर्ती चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी विठ्ठल रखुमाईच्या पाषाण मूर्ती घरात ठेवल्या. नंतर तेथील स्थानिकांच्या आग्रहा खातर या मंदिराची स्थापना करण्यात आली. या मंदिराची खासियत अशी आहे की, सणानुसार येथील विठ्ठल रखुमाईची वेशभूषा बदलली जाते.

पत्ता - हे मंदिर आशिर्वाद अपार्टमेंट, लक्ष्मीबाई केळकर मार्ग, सायन मेन रोड, सायन फ्लायओव्हर जवळ सायन येथे आहे.

Ashadhi Ekadashi 2023 Vitthal Mandir in Mumbai
Ashadhi Wari 2024 : एक हात कमरेवर तर एक मोकळा; काय आहे विजयी पांडुरंगाची कथा!

३) विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट - माहीम (Vitthal Rukmini Mandir Mahim)

माहीम येथील विठ्ठल रखुमाईचे मंदिर हे ९६ वर्ष जुनं असून १९१६ साली बांधण्यात आले. १९१४-१५ साली माहीमध्ये प्लेगची साथ पसरली असता एका व्यक्तीने या विभागात विठ्ठल रखुमाईचे मंदिर स्थापन करण्यास सांगितले. या मंदिरात प्रवेश करताच गणेशाची व गरुडाची मूर्ती नजरेस पडते. (temple)

पत्ता - हे मंदिर मोरी रोड पोस्ट ऑफिसच्या समोर, माहीम फाटक जवळ आहे.

Ashadhi Ekadashi 2023 Vitthal Mandir in Mumbai
Ashadhi Wari 2023: विठूमाऊलीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूरसाठी रविवारपासून जादा बस

४) विठ्ठल रखुमाई मंदिर - विलेपार्ले

विलेपार्ले येथील मंदिर ८१ वर्ष जुने असून १९३५ साली या विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना करण्यात आली होती. हे मंदिर लक्ष्मीदास गोकुळदास तेजपाल यांच्या मुलीच्या जन्मदिनानिमित्त बांधले असे म्हटले जाते.

मंदिरात प्रवेश करताच त्याबद्दल थोडक्यात माहीती देणारा शिलालेख नजरेस पडतो. या मंदिरात विठ्ठल रखुमाईसोबत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरवरांचे फोटो देखील आहे. (Ashadhi Wari)

पत्ता - हे मंदिर तेजपाल स्कीम रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.