Ashadhi Wari 2023 : भक्त पुंडलिकाने विठुरायाकडे फेकलेल्या विटेवर पांडुरंगाने पाय ठेवला अन् इंद्रराजाचा उद्धार केला

Bhakt Pundalik Story: तुम्हाला हे माहितीय का की ज्या विटेवर भगवंत उभे होते ती वीट म्हणजे नक्की कोण होते?
Ashadhi Wari 2023: Bhakt Pundalik Story
Ashadhi Wari 2023: Bhakt Pundalik StoryeSakal
Updated on

Bhakt Pundalik Story: बघता बघता आषाढी एकादशी अगदी उद्यावर येऊन ठेपलीय. वैष्णव भक्तासाठी कुंभमेळ्याप्रमाणे असलेल्या या सोहळ्याचे वैशिष्ट्यच न्यारं असतं.

भगवान विष्णूचे अनेव अवतार आहेत. भक्त प्रल्हादासाठी नृसिंहाचे रूप घेतलेले देखील भगवान विष्णूच होते आणि गोकुळात रंग खेळणारे नटखट बाळ कृष्णही विष्णूच होते. (Ashadhi Wari 2023)

तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरीनाथ पांडूरंगही विष्णूचेच अवतार होय. आपण पाहिलं की रुक्मिणी माता रुसली आणि दिंडीरीबनात येऊन बसली.

तिच्या शोधत श्रीकृष्णही पंढरपुरात आले. पण ते इथेच थांबले ते एका भक्तासाठी. तो भक्त म्हणजे भक्त पुंडलिक होय. (Bhakt Pundlik story)

Ashadhi Wari 2023: Bhakt Pundalik Story
Ashadhi Ekadashi 2024 : रूक्मिणी रूसली अन् द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरीनगरीत येऊन पांडुरंग झाले!

आई वडिलांची सेवा करणारे भक्त पुंडलिक यांच्या भेटीसाठी जेव्हा साक्षात विष्णू भगवंत गेले. तेव्हा पुंडलिकांनी देवाला एका जागी थांबण्यास सांगितले.

मी जरा आई बाबांचे पाय चेपतोय तोवर देवा तुम्ही या विटेवर उभं रहा. असा आदेशच या भोळ्या भक्ताने पांडुरंगाला दिला. पांडुरंगानेही भक्तांच्या इच्छेचा मान राखत कमरेवर हात ठेऊन तो उभा राहिला.

ही कथा तर आपल्याला माहितीय. पण तुम्हाला हे माहितीय का की ज्या विटेवर भगवंत उभे होते ती वीट म्हणजे नक्की कोण होते? तर ते होते साक्षात देवाधिदेव इंद्र. होय! काय आहे या विटेचा आणि इंद्र राजांचा संबंध? आज जाणून घेऊयात..

Ashadhi Wari 2023: Bhakt Pundalik Story
Ashadhi Ekadashi 2023 : दर्शनाला आले आणि विठोबालाच सोबत घेऊन गेले, अनेक वर्ष पंढपुरात नव्हता पांडुरंग!

पुंडलिकाने पांडुरंगास जी वीट बसावयास टाकली ती वीट म्हणजे साक्षात इंद्रच होय. पूर्वी वृत्रासुर नावाचा एक दैत्य होता. त्यास तीन मस्तके होती. इंद्राचे पद आपणास मिळावे म्हणून तो मोठी तपश्चर्या करू लागला. तेव्हा इंद्रास असे वाटले की, हा अशा तपाच्या योगाने माझे पद घेईल.

तेव्हा इंद्र राजाने आपल्या एका सेवकास सांगितले की, "तू या वृत्रासुराचा वध कर.” नंतर त्या सेवकाने एके दिवशी तो दैत्य ध्यानस्थ बसलेला पाहून त्याची तिन्ही शिरे तोडली. त्यावेळी ती शिरे गदगदा हसत खाली पडली.

Ashadhi Wari 2023: Bhakt Pundalik Story
Ashadhi Wari : वारीतून मिळाला जगण्याचा ‘राजमार्ग’; उच्चशिक्षित युवकाची भावना

त्यासमयी दैत्याने इंद्रास शाप दिला, "लोहदंडे सूर्यतीर्थे हरेलोंष्ठत्वमाप्नुहि" अर्थात, “हे दुष्टा, तू महाविश्वासघातकी आहेस. मी अनुष्ठान करीत बसलो असता तू माझा वध केलास. त्यामुळे तुला ब्रह्महत्या घडली. त्याबद्दल मूर्खा, दिंडीरवनाचे ठायी वीट होऊन अचेतन पडशील.” असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडला.

मग इंद्र मोठ्याने शोक करू लागला, तेव्हा श्रीविष्णूने त्यास वर दिला की, "हे इंद्रा, मी तुझा उद्धार करीन." नंतर इंद्र पुंडलिकाच्या आश्रमात शापामुळे वीट होऊन दिंडीरवनाच्या ठायी पडला.

प्रदीर्घ काळ लोटल्यावर पुंडलिकास वर देण्याकरिता श्रीविष्णू तेथे आले. त्यासमयी पुंडलिकाने तेथे पडलेली वीट देवास बसण्याकरिता दिली. नंतर महाविष्णूने पदस्पर्श करून इंद्राचा उद्धार केला.

Ashadhi Wari 2023: Bhakt Pundalik Story
Ashadhi Wari 2023 : २५० वर्षांनंतर जन्म घेऊनही संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट कशी घेतली?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()