Aashadhi Ekadashi 2022: वारकरी सांप्रदायाची स्थापना नेमकी कधी आणि कशी झाली?

वारकरी सांप्रदायात कशी रूजली, विठ्ठल भक्तीची मुळे याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
वारकरी वारीचा आनंद  घेतांना
वारकरी वारीचा आनंद घेतांनाsakal
Updated on

भक्त पुंडलिकाचा काळ सांप्रदायामध्ये प्रचलित आख्यायिकेनुसार, वारकरी सांप्रदायाची सुरुवात ही भक्त पुंडलिकापासून झाली आहे. पुंडलिकाने त्यांच्या आईवडिलांच्या केलेल्या सेवेवर प्रसन्न होऊन देव पंढरपूर आले होते ही गोष्ट प्रसिद्ध आहे.

वारीच्या दृष्टीने विचार केला तर महादेव आणि महादेवाचा परिवार हे आद्य वारकरी अशी वारकऱ्यांची कल्पना असून त्यासंदर्भातील कथा बहुतेक फडांवर सांगितल्या जातात. शंकराचार्यांनी लिहिलेल्या स्तोत्रावरून पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सातव्या शतकात प्रसिद्ध होतं असं म्हणता येते, अर्थात या स्तोत्रामधे वारीचा अथवा संप्रदायाचा उल्लेख नाही. (stablishment of Wari Sampradaya)

वारकरी वारीचा आनंद  घेतांना
पंचाग 8 जुलै : पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

खर पाहिलं तर वारकरी संप्रदायाचा इतिहास हा संत ज्ञानदेव, संत नामदेवांच्या काळापासून सांगितला जातो. त्याचं अत्यंत मार्मिक वर्णन बहिणाबाईंनी पुढील अभंगात केलं आहे.

संतकृपा झाली। इमारत फळा आली।।

ज्ञानदेवे घातला पाया। उभारिले देवालया।।

नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार।।

जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।

बहेणी फडकते ध्वजा। निरुपण आले ओजा।।

साधारणतः १२ व्या शतकापासून म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासुन वारकरी संप्रदायाचे महत्त्व वाढत गेले. समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांना याच काळात भक्तीचे क्षेत्र खुले झाले. या सर्व वारकऱ्यांना भागवत सांप्रदायाच्या एका झेंडाखाली एकत्र आणण्याचे कार्य अनेक संतानी केले. त्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर हे व्यासपीठ म्हणून उपयोगात आणले. संत ज्ञानेश्वरनंतर मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, रोहिदास, चोखामेळा, संतसेना, सावतामाळी, एकनाथ, तुकाराम इ. अनेक संतांनी आपल्या भक्तिरसपूर्ण अभंगाद्वारे भागवत सांप्रदायाची परंपरा व्यापक केली. या सर्व संताच्या साहित्यात,अभंगात श्रीक्षेत्र पंढरपूरचे माहात्म्य अपरिहार्यपणे आले आहे.

वारकरी वारीचा आनंद  घेतांना
आठवड्यातील 'या' दिवशी नखे का कापली जात नाही, जाणून घ्या कारण

संत ज्ञानेश्वरांपुर्वी आठव्या शतकापासून कर्नाटकात विठ्ठल भक्तीचा प्रारंभ झाल्याचे दिसून येते. आठव्या शतकातील कर्नाटकात विठ्ठल भक्तीचा प्रारंभ झाल्याचे दिसून येते. आठव्या शतकातील कर्नाटकचे अचलानंद वैष्णव परंपरेतील तिथले संत व्यासराय, ब्रम्हण्यतीर्थ, श्रीपादराय यांनी कर्नाटकात विठ्ठल भक्ती आणि पंढरपूरचे माहात्म्य वाढवले. अचलानंदांच्या प्रयत्नांमुळे विठ्ठलभक्तीची धारा अनेक प्रांतात गेली.

आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासाठी ।

अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने ।

विषयलोभी मने । साधन हे बुडविले ।

पिटु भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी दरारा ।

श्री विठ्ठल आणि पंढरपूर यांचं संत तुकारामांनी आपल्या साऱ्या आयुष्याशी एक अतूट नाते जोडले. त्यांच्या अनेकअभंगात ठायी ठायी आलेला या दोहोंचा उल्लेख याचीच प्रचिती देतो.

वारकरी वारीचा आनंद  घेतांना
तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा

तुका म्हणे करा जयजयकार आनंदे।

गायीन ओवीया पंढरीचा देव ।

आमुचा देव तो पांडुरंग ।

रंगले हे चित्त माझे तयापायी ।

म्हणवुनी घेई हाची लाहो ।

तुकारामांसारख्या संतांनी बळकट केलेल्या भागवत सांप्रदायात जातीभेदाला, मत्सराला, द्वेषाला, बेगडी प्रतिष्ठेला स्थान नाही म्हणुनच पंढरीच्या वाटेवर विठुनामाचा गजर करत जाणाऱ्या शेकडो पालख्यांसमवेत अनेक परदेशी भक्तजनदेखील सामील होताना दिसतात. विष्णूचा अवतार समजल्या गेलेल्या पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मुर्तीत भागवत भक्तांसाठी आकर्षणाची मोठी शक्ती सामावलेली आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने प्रांतीय आणि राष्ट्रीय एकात्मता साधणारा पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीचा हा चिवट धागा येणाऱ्या काळातही माणसामाणसांना जोडत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.