सकाळ डिजिटल टीम
मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांनीआजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सचिन यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं.
'मझली दीदी' या सिनेमाच्या निमित्ताने त्यांना मीनाकुमारी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात त्यांनी किशन ही महत्वाची भूमिका साकारली.
सिनेमाचं शुटिंग सुरु असताना सचिन यांचे हिंदी उच्चार चुकीचे असल्याचं मीना कुमारी यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सचिन यांच्या आई-बाबांना सांगितलं कि, त्या त्याला उर्दू शिकवतील.
सचिन यांच्यासाठी मीना कुमारी यांचा ड्रायव्हर आठवड्यातून चार वेळा घ्यायला यायचा. मीना कुमारी दोन तास सचिन बरोबर वेळ घालवायच्या.
या वेळेत मीनाकुमारी सचिन यांच्याबरोबर एक तास टेबल टेनिस खेळायच्या आणि एक तास उर्दू शिकवायच्या. सुरुवातीला सचिन यांना उर्दू शिकायला कंटाळा यायचा पण नंतर मीनाकुमारी यांचा उद्देश समजल्यावर त्यांनी सचिन यांनी गांभीर्याने उर्दू शिकली
सचिन आता स्वतः शायरी करतात आणि त्यांच्या उर्दू भाषेबद्दल होणाऱ्या कौतुकाचं सगळं श्रेय त्यांनी मीनाकुमारी यांना दिलंय.