सकाळ डिजिटल टीम
23 वर्ष जुनी गोष्ट
प्रियंका चोप्राने वर्ष २००० मधे मिस वर्ल्डचा किताब तिच्या नावे केला.
मिस वर्ल्ड काँटेस्ट
लंडनच्या मिलेनियममधे मिस वर्ल्ड काँटेस्ट झाला होता. ज्यात प्रियंका चोप्रानेही पार्टिसिपेट केलं होतं.
प्रियंकाला विचारण्यात आला होता हा प्रश्न
प्रियंका चोप्राला विचारण्यात आलं होतं की, जगातील जिवंत महिलांमधे ती कुठली महिला यशस्वी महिलेच्या रुपात बघते किंवा तिच्या आयुष्यातील आयडियल महिला कोणती?
प्रियंकाने दिलं होतं चुकीचं उत्तर
प्रियंका चोप्राने उत्तरात मदर टेरेसाचं नाव घेतलं. मदर तेरेसा यांचा मृत्यू या काँटेस्टच्या तीन वर्षाआधीच १९९७ मधे झाला होता.
प्रियंकाने चुकीचं उत्तर देऊनही वाजल्या टाळ्या
प्रियंकाला जिवंत महिलांमधील यशस्वी महिला विचारली असताना तिने दिवंगत मदर टेरेसांचं नाव घेतलं. म्हणाली, मला त्यांचं फार कौतुक वाटतं. मी त्यांना आपला आदर्श मानते.
अन् प्रियंकाने जिंकला किताब
प्रियंका चोप्राचं चुकीचं का होईना पण उत्तर ऐकून टाळ्यांचा गडगडाट झाला. जजेसने इंप्रेस होउन क्राउन प्रियंकाच्या नावे केलं.
तेव्हा तिचं वय १७ वर्षे होतं
प्रियंका चोप्राने जेव्हा मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १७ वर्षांची होती.
पद्मश्री विजेता
प्रियंका चोप्राने दोन नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत. तसेच तिला भारत सरकारकडून पद्मश्री अवॉर्डसुद्धा मिळालाय.
Priyanka Chopra Miss World Answerप्रियंका चोप्रा सध्या तिची मॅरिड लाइफ नवरा निक आणि मुलगी मालतीसह एन्जॉय करतेय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.