सकाळ डिजिटल टीम
दररोज बादाम खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, तसेच याचे तुमच्या त्वचेसाठी देखील अनेक फायदे आहेत.
बादामात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई आढळतं जे तुमच्या त्वचेला मॉइस्चराइज ठेवण्यात मदत करते.
त्वचा कोरडी पडत असेल तर बादाम खाल्ल्याने फायदा होईल, यामध्ये लिनोलिक अॅसिड असते जे स्किनचा कोरडेपणा घालवते.
बादाम तुम्ही एक्सफोलिएटर म्हणून देखील वापरू शकता, यामुळे त्वचेतील अशुध्दी दूर होते.
मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन असल्याने बादाम डोळ्यांखालील डार्क सर्कल्स पासून देखील सुटका देतात.
पिंपल फ्री स्किन हवी असल्यास बादाम खा, यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल.
दररोज ५-६ बादाम खाणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. रात्रभर भिजवून देखील बादाम खाता येतील.
रात्रभर भिजवलेल्या बादामांची दुधात मिसळून केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने धूवा. त्वचेला नक्की फायदा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.