Aishwarya Musale
आपल्या घरात अनेक वर्षांपासून तुपाशिवाय पोळी किंवा भात खाल्ला जात नाही. गरमागरम पोळी आणि तूप खाण्याचा आनंद काही औरच असतो.
पराठ्यांवरसुद्धा तुपाऐवजी ऑलिव्ह ऑईल लावले जाते. पण हेल्थ आणि फिटनेससाठी ते घातक असते.
पोळीवर तूप लावून खाल्ल्याने एनर्जी आणि जबरदस्त ताकद मिळते. तूप-पोळी खाण्याचे सर्व फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तूप एका ठराविक प्रमाणात खाल्ले तर फायदेशीर ठरते. वजन कमी करणारे अनेक लोक त्यांच्या आहारातून तूप काढून टाकतात, पण ते योग्य नाही.
तूप खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. तूपामध्ये फॅट सॉल्यूबल व्हिटॅमिन्सही असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
तसेच हार्मोन्स संतुलित ठेवून हेल्दी कॉलेस्ट्रॉल कायम राखतात. तूप जास्त आचेवर गरम केल्यास पेशींच्या कार्याला हानी पोहोचवणाऱ्या कणांची निर्मितीही थांबते.
पण पोळीवर जास्त तूप लावणे योग्य नाही. ते थोड्याच प्रमाणात घेऊन नीट पसरवावे. आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात खाल्ल्यास त्यामुळे नुकसानच होऊ शकते.
रिपोर्ट्सनुसार, मलायका आणि कतरिना या अभिनेत्रींसह अनेक बी-टाउन सेलिब्रिटी त्यांच्या दिवसाची सुरुवात तुपाने करतात. सकाळी उठल्यावर ते रिकाम्या पोटी एक चमचा तूप खातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.