मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आजवर अशोक मामांनी अनेक मराठी नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अशोक मामांनी व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश करण्यापूर्वी एक एकांकिका बसवली होती. जी खूपच गाजली.
पण तुम्हाला माहितीये का ? अशोक मामा मात्र स्वतः बसवलेल्या एकांकिकेचे फक्त दोनच प्रयोग करू शकले. या एकांकिकेचं नाव होतं 'म्हँ'
फक्त दोनच पात्र असलेली आणि कोणतीही प्रॉपर्टी न वापरता सादर केलेली ही एकांकिका होती. सत्तरच्या दशकात अशोक सराफ यांनी त्यांचा मित्र रमेश पवारची मदत घेऊन ही एकांकिका तयार केली.
अशोक सराफ यांनी रमेश यांना नाटकाची वन लाईन स्टोरी ऐकवली. त्यातून एका दिवसात रमेश यांनी संपूर्ण एकांकिका लिहून आणली.
ही एकांकिका जेव्हा रमेश आणि अशोक सराफ यांनी सादर केली तेव्हा ती खूप गाजली. पण या एकांकिकेचे अशोक सराफ फक्त दोनच प्रयोग करू शकले कारण त्यात खूप धावपळ होती.
पुढे या एकांकिकेचे अनेक कलाकारांनी वेगवेगळे प्रयोग केले पण स्वतः बसवलेली ही एकांकिका अशोक सराफ अजून पुन्हा एकदा सादर करू शकले नाहीत.