सकाळ डिजिटल टीम
सोन्याचा वापर अलंकार आणि गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
भारतात सोन्याला जास्त पसंदी दिली जाते. त्यामुळे सोन्याच्या वापरात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
जगात चीनमध्ये सोन्याचा वापर सर्वाधिक होतो, त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो
कोणत्या देशाकडे सर्वाधिक सोने आहे हे तुम्हाला माहितेय का?
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, सोन्याचा जास्त साठा असणाऱ्या देशामध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमिरिकेकडे ८१३३ टन सोने आहे.
यादीमध्ये जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर असून देशाकडे ३३५५ टन सोने आहे.
इटली (२४५२ टन) तिसऱ्या, फ्रांन्स (२४३७ चौथ्या, रशिया (२३३०) पाचव्या आणि चीन (२११३ सहाव्या
स्वित्झर्लंड (१०४० टन) सातव्या, तर ८४६ टन साठ्यासह जापान आठव्या स्थानी आहे.
टॉप टेनमध्ये भारत नवव्या स्थानी असून देशाकडे ७९७ टन सोने आहे. दहाव्या स्थानी नेदरलँड असून ६१२ टन सोने आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.