Sudesh
पोर्तुगालमधील फोटोग्राफर सुइसास (Suissas) हा आपल्या क्रिएटिव्ह फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर त्याने आपले फोटो शेअर केले आहेत.
हा फोटोग्राफर इमारती, पूल अशा गोष्टींना छोट्या गोष्टींसोबत जोडून अजब फोटो तयार करतो. त्याचे हे फोटो पाहून तुम्हीही चक्रावून जाल.
या इमारतीमधील असलेल्या गोल गॅपचा वापर करुन, एक लाईट बल्ब पकडल्याचा आभास निर्माण केला आहे.
खरंतर ही एक गोल आकाराची इमारत आहे, मात्र आपल्या क्रिएटिव्हिटीने सुइसासने याला कॅमेऱ्याची लेन्स केलं आहे.
या फोटोमध्ये दिसणारी गुलेल ही खरंतर एक पूल आहे. पुलाचा उलटा फोटो काढून इल्यूजन तयार करण्यात आलं आहे.
हा आणखी एक उलटा फोटो. त्रिकोणी इमारतीला अंगठीमधील हिरा करण्याचं कुणालाच सुचलं नसतं.
या ईमारतीच्या विचित्र आकाराचा फायदा याठिकाणी फोटोग्राफरने घेतला आहे. साईडला एक पेपर रोल लावून त्याला वेगळंच रुप दिलंय.
समुद्रकिनारी असलेल्या दगडांच्या रचनेमुळे एखादा शॅम्पेन ग्लास असावा असा आकार तयार झाला आहे.
एका बाजूला एक असणाऱ्या इमारती या मार्करप्रमाणेच दिसत असल्याचं पाहून, हे इल्यूजन तयार केलं आहे.
या इमारतीचा रंग, आणि फोटोग्राफरने वापरलेली छोटीशी ट्रिक यामुळे हा क्रिएटिव्ह फोटो तयार झाला आहे.
पुलाचं पाण्यातील रिफ्लेक्शन हे चाकांप्रमाणे दिसतंय, त्यामुळे साधे बूटही स्केटिंग शूज झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.