Digital Detox म्हणजे काय? फोन, इंटरनेटपासून ब्रेक घेणे का आहे गरजेचं

सकाळ डिजिटल टीम

स्क्रीन टाइम वाढतोय

डिजिटल टेक्नोलॉजीमुळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच वेळ खर्च होत आहे. कित्येक जण एकटक स्क्रीनवर काही-न्-काही पाहण्यात स्वतःचे मनोरंजन करून घेत असतात. पण यामध्ये ‘डिजिटल डिटॉक्स’ची भूमिका महत्त्वाची असते. 

Digital Detox News | sakal

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?

फोन, लॅपटॉप, इंटरनेट या डिजिटल तंत्रज्ञानापासून ब्रेक घेण्याच्या प्रक्रियेस डिजिटल डिटॉक्स असे म्हणतात. यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

Digital Detox News | sakal

एक-दोन तास स्क्रीनपासून राहा दूर 

तंत्रज्ञानामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नयेत, अशी इच्छा असल्यास दिवसभरातून शक्यतो एक - दोन तास स्क्रीनपासून दूर राहावे.  

Digital Detox News | sakal

नोटीफिकेशन ठेवा बंद

आवश्यक नसल्यास काही अ‍ॅप्सचे नोटीफिकेशन बंद करून ठेवा.

Digital Detox News | sakal

कुटुंबीयांसोबत वेळ घालवा

मोबाइल, लॅपटॉप स्क्रीनपासून स्वतः दूर ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. 

Digital Detox News | sakal

फिटनेसवर लक्ष केंद्रित करा 

मोबाइल फोनवर वेळ घालवण्याऐवजी वर्कआऊट रूटीन फॉलो करा. नियमित व्यायाम करा, पुस्तके वाचा. वेळेत झोपेतून उठा आणि वेळेवर झोपा. 

Digital Detox News | sakal

जेवताना नो स्क्रीन टाइम

जेवत असताना हातामध्ये मुळीच मोबाइल फोन घ्यायचा नाही, असा नियमच घरामध्ये तयार करून ठेवा. 

Digital Detox News | sakal

मित्र-मैत्रिणींना भेटा

डिजिटल टेक्नोलॉजीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्षात भेटा. त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवा. यामुळे नातीही मजबूत होतील.

Digital Detox News | sakal

टीव्ही/फोन वापरणं टाळा

बेडरूममध्ये झोपायला जात असताना टीव्ही किंवा फोनचा वापरणं करणे टाळा. यामुळे तुमच्या झोपेवर वाईट परिणाम होतो, हे लक्षात घ्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Detox News | sakal