Aishwarya Musale
या दिवाळीत काही वेगळे करून पहायचे असल्यास तुम्ही ही लाडूची रेसिपी ट्राय करु शकता.
अगदी घरी असलेल्या वस्तूंमधून तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. ताजे किसलेले खोबरे, गुळ असे साहित्या वापरून तुम्ही ही खोबऱ्याचे लाडू बनवू शकता.
किसलेले खोबरे - दीड वाटी, गूळ - 3/4 था कप, वेलची पावडर - १/४ टी स्पून, तूप - 1 टीस्पून, पाणी
एका पातेल्यात थोडे पाणी घ्या. त्यात गूळ घालून मंद आचेवर ते शिजवून घ्या. त्या पाण्यात गूळ पूर्णपणे विरघळला की, गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
आता एका हे मिश्रण भांड्यात गाळणीतून गाळून घ्या. दुसर्या बाजूला नॉन-स्टिक पॅन घ्या. पॅन मंद आचेवर ठेवून तूप गरम करुन घ्या.
नंतर यात किसलेले खोबरे घाला आणि सुमारे 2-3 मिनिटे परतवून घ्या. या किसलेल्या खोबऱ्यात गुळाचे पाणी घाला आणि चांगले एकजीव करा.
नंतर वेलची पूड घालून पुन्हा एकदा हे मिश्रण हलवून घ्या. यातील ओलावा निघून जाईपर्यंत शिजवून घ्या आणि तुम्हाला गूळ-नारळाचे मिश्रण सुकताना दिसेल.
आता गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या. आपले हाताला तूप लावा आणि लाडू हव्या त्या आकाराचे लाडू वळून घ्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.