Aishwarya Musale
दिवाळी जवळ आली आहे, दिवाळी हा सगळ्याच सणामधला खूप महत्त्वाचा सण म्हटला जातो. आपण सगळेच पूर्ण भारतात हा सण खूप जल्लोषात साजरा करतो. आता वेळ आली असेल ती आपल्या प्रियजनांना दिवाळी साठी एक खास भेटवस्तू देण्याची.
आणि नक्की कोणाला काय घ्यावं याची यादीही तुम्ही करतच असाल पण या सगळ्यात काही गोष्टी गिफ्ट म्हणून देणे टाळले पाहिजे.
वास्तुशास्त्राच्या मते, अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या कोणालाही भेट म्हणून देयला नको. अशा वस्तू देऊन, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंदाच्या ठिकाणी दुःख किंवा त्रास सुरू होउ शकतो. तुमच्या नात्यातही कटुता येऊ शकते.
भेटवस्तू म्हणून कोणत्याही हिंसक प्राण्याचे चित्र कधीही देऊ नये. वाघ, सिंह अशा प्राण्यांचे चित्र किंवा त्याच्याशी निगडित गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ नये. कारण हिंसक प्राण्यांच्या या चित्रमुळे घरातही तसेच वातावरण निर्माण होऊ शकते.
वास्तूशास्त्रात असे म्हटले आहे की एखाद्याला रुमाल भेट म्हणून देऊ नये. याने नात्यात कटुता येते; तुमच्या दोघांमधला तणाव वाढू शकतो. शास्त्रानुसार एकमेकांचा रुमाल वापरणही चुकीचं आहे.
वास्तुशास्त्रानुसार, निसर्गाशी संबंधित चित्रे भेट म्हणून देयला नको.
विशेषत: वाळवंट, कोरडी झाडे, बुडणारी जहाजे आणि सूर्यास्ताचे देखावे यांची छायाचित्रे कोणालाही देऊ नयेत किंवा ती कोणाकडूनही घेऊ नयेत.
याचे मुख्य कारण म्हणजे ह्या अशा चित्रांना बघून ते घरात असण्याचे घराचे वातावरण तसे व्हायला लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.