पावसात भिजल्यानंतर लगेच करा हे काम, सर्दी-खोकल्यासारखे दूर राहतील आजार

Aishwarya Musale

पाऊस

पावसात भिजल्यामुळे अनेकदा लोक आजारी पडतात. म्हणून अनेकांना इच्छा असूनही पावसाचा आनंद घेता येत नाही.

rain | sakal

आजारपण

मात्र आपण पावसात भिजलोच तर आजारपण टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता. आज आम्ही तुम्हाला यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.

rain | sakal

डोके झाकणे

पावसात भिजलेले केस सुकवणे बऱ्याचदा कठीण होते. त्यामुळे तुम्हाला सर्दी होण्याचा धोका असतो. म्हणून अचानक पाऊस आल्यास सर्वप्रथम आपले डोके कशाने तरी झाकावे.

rain | sakal

ओले कपडे त्वरित बदला

पावसात भिजल्यानंतर जास्त वेळ ओले कपडे घालणे म्हणजे रोगाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे लवकरात लवकर ओले कपडे बदलण्याचा प्रयत्न करा.

rain | sakal

अँटी-बॅक्टेरियल क्रीमची मदत घ्या

पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे दाद, खरुज, खाज सुटणे यांसारख्या त्वचेच्या संसर्गालाही तुम्ही बळी पडू शकता.

rain | sakal

शरीर

म्हणून भिजल्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल क्रीमची मदत घ्या. अँटी-बॅक्टेरियल क्रीम शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

rain | sakal

गरम चहा प्या

पावसात भिजल्यावर थंडी जाणवणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सर्दी आणि ताप टाळण्यासाठी गरम चहा पिण्यास विसरू नका. चहा प्यायल्याने तुमच्या शरीराचे तापमान तर सामान्य होईल.

rain | sakal

पायांची काळजी घ्या

काही लोक पावसात पायांची काळजी घेणे टाळतात. घरी आल्यानंतर पाय चांगले धुतल्यानंतर अँटी-बॅक्टेरियल क्रीम लावायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rain | sakal