युट्यूबवरचा उपाय योग्य असेलच असं नाही, या 9 गोष्टी चेहऱ्याला लावू नका

साक्षी राऊत

बऱ्याच गोष्टींचे ब्रँड नेम जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे या गोष्टींचा वापर आपण अगदी विश्वासाने करतो. मात्र यातील काही गोष्टींचा वापर चेहऱ्यासाठी कधीच करू नका.

Skin Care

टूथपेस्ट

ब्लॅक हेड किंवा पिंपल्ससाठी अनेकदा युट्यूबवर देखील टूथपेस्ट लावा असं सांगितलं जातं. मात्र तुमची स्किन सेंसिटिव्ह असल्यास तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. तुमची स्किन जळून काळी पडू शकते. तेव्हा स्किनवर टूथपेस्ट लावू नका.

Skin Care

लिंबू

लिंबात सोरालेन नावाचे केमिकल असते. तेव्हा सेंसिटिव्ह स्किनवर चुकूनही लिंबू लावू नये.

Skin Care

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा डायरेक्ट चेहऱ्यावर लावल्यास स्किनचा पीएच लेव्हल खराब होऊ शकतो. तेव्हा ब्युटी रिलेटेड रिमेडिजसाठी बेकिंग सोडा नेहमी काही ठराविक गोष्टींत मिक्स करूनच लावावा.

Skin Care

ग्लू किंवा फेविकॉल

सोशल मीडियावर DIY रिमेडिजमध्ये ब्लॅक स्पॉट्स काढून टाकण्यासाठी हा उपाय सांगितल्या जातो. पण ग्लू तुमच्या स्किनसाठी फार टॉक्झिक आहे, यामुळे तुमच्या स्किनचे पोअर्स बंद होऊ शकतात.

Skin Care

गरम पाणी

गरम पाणी शरीरासाठी चांगले असते पण अगदी थोड्या प्रमाणात. चेहरा वारंवार गरम पाण्याने धुतल्याने तुमच्या चेहऱ्याचा सॉफ्टनेस जातो. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा निस्तेज दिसू लागते.

Skin Care

साखर

बऱ्याचदा नॅचरल स्कीन स्क्रबिंगसाठी साखरेचा स्क्रब लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र त्यामुळे रेडनेस, इरिटेशन आणि मायक्रो टियर्सच्या समस्या वाढू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care