Father's Day : जैसा बाप वैसा बेटा! कसोटीत शतक ठोकणारी पिता - पुत्र जोडी

अनिरुद्ध संकपाळ

क्रिकेट इतिहासात अनेक बाप - बेट्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. मात्र या सर्वांमध्ये युनिक जोडी ही शिवनरेन चंद्रपॉल आणि तेजनरेन चंद्रपॉल यांची आहे.

बच्चन पासून गावसकरांपर्यंत अनेक यशस्वी पित्याची झलक चाहत्यांनी त्यांच्या पुत्रांमध्ये पाहिली. मात्र ते सर्वांनाच जमले असे नाही. या बाबतीत तेजनरेन चंद्रपॉल हा अपवाद ठरतो.

शिवनरेन चंद्रपॉल हा त्याच्या आगळ्या वेगळ्या बॅटिंग स्टाईलसाठी प्रसिद्ध होता. त्याचा मुलगा तेजनरेन चंद्रपॉलमध्ये देखील त्याच्या फलंदाजीची झलक पहायला मिळते.

तेजनरेने फक्त आपल्या वडिलांची बॅटिंग स्टाईल उचलली नाही तर रेकॉर्ड करण्यातही तो वडिलांच्या हातवार हात मारतो. विशेष म्हणजे या दोघा बाप बेट्यांनी वेस्ट इंडीजच्या स्थानिक क्रिकेट सामन्यात एकाच सामन्यात खेळण्याचा विक्रम देखील केला होता.

तेजनरेनने झिम्बाब्वेविरूद्धच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या जोरावर तेजनरेन आणि शिवनरेन चंद्रपॉल हे एका खास क्लबमध्ये सामिल झाला.

कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणाऱ्या पिता पुत्रांच्या यादीत चंद्रपॉल पिता - पुत्रांचा देखील समावेश झाला. यापूर्वी तीन भारतीय पिता पुत्रांची जोडी या यादीवर अधिराज्य गाजवत होती.

यात लाला आणि मोहिंदर अमरनाथ, विजय आणि संजय मांजरेकर आणि इफ्तिकार आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी ही किमया साधली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.