धनश्री भावसार-बगाडे
बऱ्याचदा आपल्या विस्कळीत दिनश्चर्येमुळे आपला आनंद हरवलाय असं वाटतं. पण या ६ गोष्टींचा अवलंब केला तर तो परत मिळवता येईल.
जर तुम्हाला ताणापासून दूर रहायचे असेल तर सकाळचे एक रुटीन असणे आवश्यक आहे.
यामुळे तुम्हाला जाणवतं की, गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत. जेव्हा गोष्टी कंट्रोलमध्ये वाटतात तेव्हा ताण कमी होतो.
हे तर आपण सगळेच जाणतो की, आपला स्क्रिन टाइम वाढला आहे. त्यामुळे थकवाही वाढला आहे आणि उत्पादकता कमी झाली आहे.
यामुळे निराशा येते. त्यामुळे जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर तुमचा स्क्रिन टाइम कमी करा.
कामाशिवाय नवीन काहीतरी शिका. त्याच त्या कामाच्या ताणातून रिलीफ शोधा.
तुमच्या सर्जनशीलतेला चालना मिळेल असं सतत नवीन शिकत रहावे. यामुळे उत्साह आणि आनंद वाढतो.
आनंदी जगण्यासाठी आपण आपल्या मर्यादा ओळखलेल्या असणं आवश्यक आहे. जर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं तर त्यामुळे ताण वाढतो.
इतरांना महत्व देण्याच्या नादात आपण स्वतःला त्रास करून घेतो. त्यामुळे कोणाला किती महत्व द्यायचं हे आपलं आपण ओळखायचं असतं.
तुमच्या प्रत्येक लहानसहान अचिव्हमेंट्सपण साजऱ्या करणे गरजेच्या आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आनंदही मिळतो.
तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. त्या समजून घ्या. काहींना भावना व्यक्त करणे चुकीचे वाटते. त्याकडे ते लक्ष देणं बंद करतात. त्यामुळे सतत दुःखी राहतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.