Sudesh
हार्ले डेव्हिडसन या कंपनीच्या बाईक्स जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, या गाड्या महागड्या असल्यामुळे सामान्यांच्या आवाक्यात नव्हत्या.
मात्र, आता हार्लेने हीरो मोटोकॉर्पसोबत टायअप करून भारतात एक बाईक तयार केली आहे. पूर्णपणे भारतात तयार झालेली ही हार्लेची पहिलीच बाईक आहे.
या बाईकला हार्ले डेव्हिडसन X440 असं नाव देण्यात आलं आहे. हार्लेच्या XR1200 या मॉडेलप्रमाणे या बाईकचं डिझाईन आहे.
स्वस्त किंमतीत लाँच झाल्यामुळे ही बाईक या सेगमेंटमधील मोठी नावं असणाऱ्या रॉयल एनफील्ड आणि जावा अशा कंपन्यांना जोरदार टक्कर देणार आहे.
या बाईकमध्ये फॉरवर्ड-सेट फुटपेग, आणि स्वेप्ट बॅक हँडलबार हे दोन्ही देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे क्रूजर बाईकप्रमाणे ही गाडी असणार आहे.
या बाईकचं स्टायलिंग आणि डिझाईन हार्ले-डेव्हिडसनने केलं आहे. तर, इंजिनिअरिंग, टेस्टिंग आणि डेव्हलपिंग हीरो मोटोकॉर्पने केलं आहे.
नावात म्हटल्याप्रमाणे या बाईकमध्ये 440 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन २७hp पॉवर आणि 38Nm टॉर्क जनरेट करतं.
या गाडीमध्ये 6-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. यामध्ये ६ गिअर्स असणार आहेत, आणि स्टँडर्ड स्लिपर क्लचही देण्यात आलं आहे.
या बाईकच्या बेस व्हेरियंटची किंमत २.२९ लाख रुपयांपासून सुरू होते. X440 Denim असं या बेस व्हेरियंटचं नाव आहे. इतर दोन व्हेरियंटच्या किंमती अनुक्रमे २.४९ आणि २.६९ लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूम आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.