Aishwarya Musale
डासांमुळे होणाऱ्या या आजाराचा झपाट्याने प्रसार होत असताना लोकांनी आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिलांनी काळजी घ्यायला हवी.
गर्भवती महिलांनाच फक्त डेंग्यूचा संसर्ग होण्याचा धोका नसतो तर त्यांच्या सहित येणाऱ्या बाळाला धोका असतो. गर्भातील बाळाच्या मृत्यूसह ही परिस्थिती ओढवू शकते.
गरोदरपणात वाढत्या गर्भाला आधार देण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीत बदल होतात, ज्यामुळे गरोदर महिलांना डेंग्यूसारख्या संसर्गाचा धोका अधिक असतो. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल देखील संक्रमित झाल्यावर रोगाच्या तीव्रतेवर परिणाम करू शकतात.
त्याचवेळी, गर्भधारणेदरम्यान डेंग्यूच्या संसर्गामुळे आई आणि बाळ दोघांनाही समस्या उद्भवू शकतात, ज्यात अकाली जन्म, बाळाचे कमी वजन आणि अगदी गर्भाचा मृत्यू देखील समाविष्ट आहे.
डासांपासून संरक्षण : डास चावण्यापासून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा. बाहेर पडताना आणि झोपताना डास प्रतिबंधक औषधाचा वापर करा.
डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पाणी साठवण्याची जागा स्वच्छ ठेवावी. भांडी, कुलर व इतर ठिकाणी पाणी साचू नये म्हणून खबरदारी घ्यावी.
वेळेनुसार जास्तीत जास्त पूर्ण कपडे घालण्याचा प्रयत्न करा. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आरामदायी आणि लांब स्लीव्हचे कपडे उत्तम आहेत.
पाणी साठवण्याच्या जागा रिकाम्या ठेवा जेणेकरून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.