Harshada Shirsekar
कधी-कधी गोड खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. पण जेवल्यानंतर रोजच तुम्हाला गोड खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर आपण वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास आरोग्याच्या कोणकोणत्या गंभीर समस्या असू शकतात, जाणून घेऊया..
रक्तशर्करेत होणाऱ्या बदलामुळे शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणून जेवणानंतर काही लोकांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.
शरीरातील हार्मोनचे समतोल बिघडल्यास याचा परिणाम संपूर्ण शरीरावर पाहायला मिळतो. उदाहरणार्थ मासिक पाळी किंवा मेनोपॉजदरम्यान होणारे बदल. या बदलांदरम्यान कित्येक जणींमध्ये गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते.
मॅग्नेशिअम, क्रोमिअम आणि झिंक यासारखे पोषणतत्त्व शरीरातील रक्तशर्करा संतुलित ठेवण्यास मदत करतात. शरीरात या पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.
तणाव, चिंता इत्यादी भावनिक गुंतागुंतीमुळेही काही जणांना जेवण केल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.
काही लोकांना जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवयच असते. पण अति प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.