सकाळ डिजिटल टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचं आज १०० व्या वर्षी निधन झालं.
आईने संघर्षमय आयुष्याला तोंड देत आपल्याला व भावंडांना उत्तम संस्कार दिल्याच्या भावना मोदी कायम व्यक्त करतात.
मोदी जेव्हाही गुजरातला जात तेव्हा प्रत्येक वेळी आईला भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
आईला भेटल्यावर त्यांच्यासोबत जेवण करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी कधी टाळले नाही.
मोदींनी आईविषयी सांगितलेल्या आठवणींत त्यांनी सांगितलं आहे की, जेव्हाही मिठाई खाऊ घाले तेव्हा तिच तोंड पुसायला रुमाल देत. आई साडीला नेहमी रुमाल खोचलेले ठेवत.
मोदी सांगतात की, आईने कायमच मला निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं. त्याच्या आड कधी आली नाही, पण कायम सोबत उभी राहीली.
आईत आपल्याला कायम त्रीमुर्ती दिसले. आई भक्कम आधारस्तंभ होता असंही ते भावना व्यक्त करताना म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.