सकाळ डिजिटल टीम
अनेकांना हिरवी मिरची खायला आवडते. वडापाव असो की समोसा तोंडी हिरवी मिरची नसेल तर मजा येत नाही.
पण तुम्हाला माहिती आहे का चवीला तिखट लागणारी मिरची आरोग्यासाठी किती फायदेशीर असते? आज आपण त्या विषयी जाणून घेणार आहोत.
मिरची खाल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन-सी असते ज्याचा थेट परीणाम चेहऱ्यावर होतो.
जर तुम्हाला डायबिटीज लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही दररोज हिरव्या मिरची खावी.
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे कंपाउंड असते जे शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
हिरव्या मिरचीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शरीरातील ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित राहतं.
हिरवी मिरची खाल्याने शरीरातील मेटाबॅालिजम वाढवते.
हिरव्या मिरचीमधील पोषक घटकांमुळे आपल्या शरीरातील खराब बॅक्टेरिया नष्ट होतात.
मिरची नैसर्गिक पेनकिलर म्हणून काम करते त्यामुळे मिरचीचे आयुर्वेदमध्ये अनन्यसाधारण स्थान आहे.
त्यामुळे आपले पुर्वजही आपल्याला काहीही दुखणे असेल तर मिरची खाण्याचा सल्ला द्यायचे
मात्र मिरचीचे अतिसेवन कधीच करू नये यामुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.