फाटलेल्या दुधापासून बनवा उत्कृष्ट कलाकंद... बघा सोपी- झटपट रेसिपी

Aishwarya Musale

कलाकंद

कलाकंद हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. एकतर तो जरा कमी गोड असतो आणि दुसरं म्हणजे त्याची चवही वेगळी असते.

रेसिपी

याची रेसिपी अगदी सोपी आहे आणि शिवाय पटकन होणारी आहे.

कसं करायचं कलाकंद?


२ टेबलस्पून मिल्क पावडर, ४०० ग्रॅम कंडेन्स मिल्क, अर्धा किलो पनीर, चवीनुसार विलायची पावडर आणि वरतून टाकायला बदाम, पिस्ते असा सुकामेवा.

कृती

एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क टाका. 

पनीर

मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क व्यवस्थित हलवून घ्या. त्याचा रंग थोडा बदलू लागला आणि ते घट्ट झालं की त्यात पनीर क्रश करून टाका.

हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि मंद ते मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे शिजू द्या.

तुप

त्यात नंतर थोडीशी विलायची पावडर टाका. ताटाला तुपाचा हात फिरवा आणि हे गरमागरम मिश्रण त्यावर टाकून ते एकसारखं ताटभर पसरवा.

मिश्रण

ताटातलं मिश्रण थोडं थंड झालं की ताट एक ते दोन तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. कलाकंद त्यानंतर छान जमून येईल आणि त्याच्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडता येतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.