सकाळ डिजिटल टीम
चंदन तस्कर, हत्तींना मारणारा आणि अपहरणकर्ता विरप्पन याचा १८ ऑक्टबर २००४ रोजी खात्मा झाला होता.
वीस वर्ष पोलिसांना चकवा देणारा विरप्पन तमिळनाडू आणि कर्नाटकच्या जंगलात राहत होता. अनेक सोबती त्याला सोडून गेले होते.
विरप्पनला डोळ्यांचा आजार बळावला होता. त्याला डोळ्यांवर उपचार करायचे होते आणि भारत सोडून श्रीलंकेत जायचे होते.
विरप्पनला अन्नधान्य आणि इतर वस्तू पुरवणारा माणूस फितूर झाला. त्याने एसटीएफसाठी काम सुरु केलं.
विजय कुमार तमिळनाडू स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख होते. त्यांनी फितूराच्या सहाय्याने सापळा रचला.
श्रीलंकेतील दहशतवादी गटाचा प्रमुख प्रभाकरण याचा जवळचा असल्याचे सांगून एसटीएफने विरप्पनशी संपर्क साधला
तीन महिन्यांपासून स्पेशल टास्क फोर्सचा माणूस विरप्पनशी प्रभाकरणचा माणूस म्हणून बोलत होता. जेणेकरुन विरप्पनला आपण श्रीलंकेतील दहशतवादी प्रभाकरण याच्या संपर्कात असल्याचं वाटू लागलं.
कथित एसटीएफकडून श्रीलंकेत पोहोचण्याचं आणि डोळ्यांवर उपचार करण्याचं आश्वासन देण्यात आलं. यावर विरप्पनने विश्वास ठेवला.
विरप्पनकडे पाठवलेल्या रुग्णवाहिकेत त्याला आणि त्याच्या तीन साथीदारांना बसवण्यात आलं. विरप्पनला वाटतं होतं तो श्रीलंकेत पळून जातोय.
रुग्णवाहिकेवरती ३३८ गोळ्या चालवल्या गेल्या आणि ५२ वर्षीय विरप्पनचा खात्मा झाला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती. विरप्पनच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.