सकाळ डिजिटल टीम
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्यव यांनी शुक्रवारी बेंगळुरुमध्ये ३डी प्रिंटिंग तंत्रज्ञान पद्धतीने बनवलेल्या भारतातील पहिल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केले
बेंगळुरुतील केम्ब्रिज लेआउटमध्ये १०२१ वर्ग फूट क्षेत्रामघ्ये या पोस्ट ऑफिसचे निर्माण करण्यात आले आहे
३डी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरुन बनवलेले हे पोस्ट ऑफिस लार्सन अँड टूब्रो लिमिटेडने बनवलेलं आहे
पोस्ट ऑफिस ४५ दिवसांमध्ये बनवून पूर्ण झालेले आहे
भारताची नाविन्यता आणि प्रगती याचे हे निदर्शक असल्याचे मोदी म्हणाले
या पद्धतीत डिजिटल फाईलमधून थ्री डायमेन्शनल सॉलिड ऑबजेक्ट बनवला जातो. या पद्धतीत एकावर एक असा थर रचून ऑबजेक्ट बनवला जातो.
यात छत, भींत रोबोटिक्स मशिनच्या साहाय्याने तयार केले जातात. यात कमीत कमी माणसाचा सहभाग असतो.
कॉम्प्युटरच्या सहाय्याने सर्व ऑपरेशन नियंत्रित केलं जातं. यात वेगामध्ये थर रचले जातात.
२००० चौरस फूटाचं घर दहा दिवसांमध्ये तयार होऊ शकते. त्यामुळे ही एक नवीन पद्धत असून हळू हळू याचा वापर वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.