साक्षी राऊत
शरीरात लोहाची कमतरता झाली की थकवा जाणवतो. शिवाय रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमियाचाही त्रास जाणवतो. चला तर जाणून घेऊया काही पदार्थांची नावे जी तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करतील.
भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, सोडियम, मॅग्नेशियम आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. शरीरात लोहाची कमतरता झाल्यास भोपळ्याच्या बिया फायदेशीर ठरतात.
रक्ताची कमतरता झाल्यास पालकचे सेवन करणे फायदेशीर ठरते. पालकमध्ये असलेले लोह शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते.
शरीरात लोहाची कमतरता झाल्यास ती दूर करण्यासाठी टोफूचे सेवन करावे. यात असलेले प्रोटीन, कॅल्शियम, मँगनिज आणि फॉस्फोरस उर्जेचा प्रदान करते.
डाळिंबात लोहाची मात्रा जास्त असते. जे शरीरात रेड ब्लड कार्पस्कल्सच्या कमतरतेमुळे जाणवणारा थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
बीट आणि त्याची पाने दोघांतही लोहाची मात्रा भरपूर असते. जे शरीरात अॅनिमियामुळे जाणवणारा थकवा आणि अशक्तपणा दूर करते.
तेव्हा तुमच्याही शरीरात रक्ताची कमतरता असल्यास तुम्ही आवर्जून हे पदार्थ खावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.